आधी गणपत गायकवाड आता महेश गायकवाड यांना पोलिसांचा झटका

| Updated on: Feb 05, 2024 | 2:43 PM

Ganpat Gaikwad Firing | भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याणचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर वादात महेश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. एकूण ७० जणांवर हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांची चौकशी होणार आहे.

आधी गणपत गायकवाड आता महेश गायकवाड यांना पोलिसांचा झटका
mahesh gaikwad ganpat gaikwad
Follow us on

सुनिल जाधव, ठाणे, दि. 5 फेब्रुवारी 2024 | कल्याणमधील भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यातील वादाची राज्यात चर्चा आहे. गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच महेश गायकवाड यांना सहा गोळ्या झाडल्या. या प्रकरणात गणपत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्यांना अटकही झाली. गणपत गायकवाड यांच्यावर दुसरा अॅट्रसिटीचा गुन्हा दाखल झाला. जमिनीच्या वादातून जातीवाचक शिविगाळ केल्याच्या आरोपावरुन हा गुन्हा दाखल झाला. आता महेश गायकवाड अडचणीत आले आहेत. उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्यात शिवसेना कल्याण शहर अध्यक्ष आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यासह त्यांचे साथीदार राहुल पाटील आणि अन्य 70 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कोणता गुन्हा दाखल

महेश गायकवाड यांच्यावर कुठलीही परवानगी न घेता जागेवर कब्जा करण्यासाठी सशस्त्रपणे मोठ्या संख्येने जमा झाले. त्याठिकाणी कामगारांना शिवीगाळ करत जागेवरील सामानाचे नुकसान केले. तसेच काम बंद पाडण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या गुन्ह्यात तीन महिलांचाही समावेश असून हिल लाईन पोलिसांनी या संदर्भात तपास सुरु केला आहे.

महेश गायकवाड यांची होणार चौकशी

जखमी अवस्थेत उपचार घेत असलेल्या महेश गायकवाड व त्यांच्या साथीदार राहुल पाटील यांची प्रकृती सुधारल्यानंतर चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे. या प्रकरणात पोलिसांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. गुन्हा शाखेच्या पथकाने आज गणपत गायकवाड, हर्षल केणे आणि संदीप सरवणकर यांची अडीच तास चौकशी केली.

हे सुद्धा वाचा

भाजप आमदार म्हणतात…

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे. गणपत गायकवाड यांच्यावर कारवाई झाली आहे. गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक केली आहे. कायद्यानुसार गणपत गायकवाड यांच्यावर जी काही कारवाई करण्याची आवश्यकता असेल ती होणार आहे. पक्षशिस्तभंग आमच्या पक्षाचे अंतर्गत विषय आहे. आमच्या पक्षामध्ये कोणत्याही शिस्तीचा भंग केला तर त्याची चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत केली असते. त्या समितीकडे ते प्रकरण जाते. त्यात आता कुठलाही निर्णय एका व्यक्ती करू शकत नाही.