“उद्धव ठाकरे यांचे फडतूस भाषण, म्हणे वज्रमूठ”; भाजपकडून एकाच शब्दात वज्रमूठ सभेला प्रत्युत्तर..

महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांचं फडतूस भाषण सुरू असतानाच नागपूरमधील सुज्ञ जनतेनं धरला घरचा रस्ता असं म्हणत त्यांच्या वज्रमूठ सभेची त्यांनी खिल्ली उडवली आहे.

उद्धव ठाकरे यांचे फडतूस भाषण, म्हणे वज्रमूठ; भाजपकडून एकाच शब्दात वज्रमूठ सभेला प्रत्युत्तर..
Follow us
| Updated on: Apr 16, 2023 | 10:40 PM

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरी, मालेगाव, संभाजीनगर आणि आता नागपूरमध्ये मोठ्या गर्दीत सभा झाल्याचे महाविकास आघाडीचे नेते सांगतात. तर त्याविरोधात सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्या सभेत भाडोत्री गर्दी जमा केल्याची टीका केली जाते. आजही महाविकास आघाडीची दुसरी सभा नागपूरमध्ये झाली आहे. त्या सभेवर भाजपने जोरदार निशाणा साधला आहे.काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फडतूस गृहमंत्री म्हणून त्यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते.

तर आज महाविकास आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरे यांचे भाषण झाल्यानंतर भाजपने त्यांच्यावर निशाणा साधताना उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकण्याऐवजी लोकं उठून गेल्याची टीका भाजपने केली आहे.

भाजपकड़ून उद्धव ठाकरे यांच्या सभेच्यावेळी माणसं निघून गेल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. तर त्यांच्या भाषणावरूनही उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांना फडतूस गृहमंत्री म्हणून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यावरूनच आजच्या महाविकास आघाडीच्या सभेवर भाजपने टीका केली आहे.

महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांचं फडतूस भाषण सुरू असतानाच नागपूरमधील सुज्ञ जनतेनं धरला घरचा रस्ता असं म्हणत त्यांच्या वज्रमूठ सभेची त्यांनी खिल्ली उडवली आहे. त्यामुळे आता नागपूरच्या सभेवरून पुन्हा एकदा वाद रंगण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.