Cyclone and Monsoon : मुंबई, कोकण किनारपट्टीला अलर्ट, चक्रीवादळ ठरवणार मान्सूनची प्रगती
monsoon onset over Kerala : अरबी समुद्रात चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनवर होणार आहे. केरळमध्ये अजून मान्सूनला अनुकूल सर्व घटक तयार झालेले नाही. सध्या चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनवर होत आहे.
मुंबई : अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. या चक्रीवादळाची तीव्रता, अरबी समुद्रातील निर्मितीचे स्थान आणि त्यानंतरच्या हालचालीचा केरळवर नैऋत्य मान्सूनच्या प्रारंभावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पुढील १२ तासांत चक्रीवादळाची तीव्रता वाढत जाणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. या चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवर फार पावसाची शक्यता नाही, परंतु मच्छिमारांना सावधानतेचा इशारा दिला आहे. मच्छिमारांनी खोल समुद्रात मच्छिमारीसाठी जाऊ नये, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
चक्रीवादळाची प्रगती कुठे
मंगळवार सकाळपर्यंत चक्रीवादळ आणखी मजबूत झाले अन् आग्नेय अरबी समुद्रावर पसरले. हे सध्या गोव्याच्या 920 किमी पश्चिम-नैऋत्येस, मुंबईच्या 1,120 किमी दक्षिण-नैऋत्य दिशेला आहे. हे चक्रीवादळ पाकिस्तानकडे जात असून त्याचा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर परिणाम होणार नाही, असा अंदाज आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्र आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर पुढील 24 तासांत चक्री वादळात तीव्र होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी मान्सूनपूर्वी चक्रीवादळ
2021 मध्ये मान्सून सुरू होण्यापूर्वी चक्रीवादळ आले होते. 2023 मध्ये उत्तर हिंदी महासागरात तीन आठवड्यांत निर्माण होणारे हे दुसरे चक्रीवादळ आहे. यापूर्वी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मोचा चक्रीवादळाने बांगलादेश आणि म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
8, 9, 10 June ला कर्नाटकात गोवा-महाराष्ट्राचा किनारपट्टीच्या भागात वादळी वार्याचा वेग 40-50 kmph, 60 kmph पर्यंत पोहोचण्याची शक्यता.नैऋत्य अरबी समुद्र, कर्नाटक-गोवा-महाराष्ट्राचा किनारपट्टी समुद्र खवळलेला असण्याची शक्यता.मच्छिमारांनी क्षेत्रात जाऊ नयेhttps://t.co/Bt1OMDfC2t pic.twitter.com/TAK27ViMMW
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 6, 2023
मान्सूनची प्रगती कशी
मान्सूनसाठी अनेक घटक अनुकूल झाले आहेत. यामुळे मान्सून केरळच्या दारात आला आहे. परंतु मान्सूनच्या वाऱ्यांनी पुरेशी ताकद मिळविली नाही. यामुळे तो अजून निर्धारित वेळेत केरळमध्ये दाखल झाला नाही. उपग्रहाकडून मिळालेल्या छायाचित्रांनुसार, केरळच्या किनारपट्टीवर ढगांची निर्मिती आहे. तसेच मान्सून मजबूत होत असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. केरळमध्ये मान्सून सुरू होण्याची सामान्य तारीख 1 जून आहे, परंतु यावर्षी 4 जून ही तारीख दिली होती.
8, 9, 10 जूनला कर्नाटकात गोवा-महाराष्ट्राचा किनारपट्टीच्या भागात वादळी वार्याचा वेग 40-50 kmph पर्यंत असणार आहे. हा वेग 60 kmph पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे नैऋत्य अरबी समुद्र, कर्नाटक-गोवा-महाराष्ट्राचा किनारपट्टी समुद्र खवळलेला असण्याची शक्यता. मच्छिमारांनी क्षेत्रात जाऊ नये, असे हवामान विभागाने म्हटले आहे.