वादळ धडकणार नाही, पण मुंबईत ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार, मुसळधार पावसाची शक्यता; महापालिका अ‍ॅलर्ट

हवामान खात्याने तौक्ते चक्रीवादळ मुंबई नजीकच्या समुद्रातून जाणार असल्याचा इशारा दिल्याने महापालिकेने अ‍ॅलर्ट जारी केल्या आहेत. (Cyclone Tauktae: BMC gears up to minimise impact in Mumbai)

वादळ धडकणार नाही, पण मुंबईत ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार, मुसळधार पावसाची शक्यता; महापालिका अ‍ॅलर्ट
Tauktae Cyclone bmc
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 6:53 PM

मुंबई: हवामान खात्याने तौक्ते चक्रीवादळ मुंबई नजीकच्या समुद्रातून जाणार असल्याचा इशारा दिल्याने महापालिकेने अ‍ॅलर्ट जारी केल्या आहेत. मुंबईला या वादळाचा धोका नसला तरी मुंबईत आज ताशी 50 किलोमीटर आणि उद्या ताशी 80 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे मुंबईत जोरदार पावसाची शक्यता असल्याने महापालिकेच्या सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. (Cyclone Tauktae: BMC gears up to minimise impact in Mumbai)

पालिकेच्या स्तरावर करण्यात आलेली तयारी व सुसज्जता आणि इतर संबंधित यंत्रणांनी केलेली तयारी याचा आढावा मुंबई उपनगरे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त ( पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे व मुंबई शहर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली आज एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित या आढावा बैठकीला अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश निवतकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई पोलीस दलाचे सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह महानगरपालिकेचे अतिवरिष्ठ अधिकारी व केंद्र शासनाचे अधिकारी उपस्थित होते.

त्याचबरोबर भारतीय हवामान खाते, ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक’ (एनडीआरएफ), मुंबई अग्निशमन दल, ‘बेस्ट’ सह विविध वीज वितरण कंपन्या, मध्य व पश्चिम रेल्वे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एम. एम. आर. डी. ए.), मुंबई मेट्रो इत्यादी संस्थांचेही प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.

बैठकीत काय ठरलं?

>> बैठकीच्या सुरुवातीला भारतीय हवामान खात्याच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी ‘तौक्ते’ या चक्रीवादळा बद्दल थोडक्यात माहिती दिली. या चक्रीवादळाचा मुंबईला धोका नाही. तथापि, ते मुंबईनजीकच्या समुद्रातून जाणार असल्याने त्याच्या प्रभावाने मुंबईत पाऊस होण्यासह वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले. यानुसार 15 मे रोजी मुंबईतील वाऱ्याचा वेग हा ताशी 40 ते 50 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो. तर रविवार, 16 मे रोजी सायंकाळपासून वाऱ्याचा वेग वाढून तो ताशी 60 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो. तर त्याच दिवशी काही ठिकाणी हा वेग ताशी 80 किलोमीटर पर्यंत जाऊ शकेल, अशीही माहिती या बैठकीदरम्यान भारतीय हवामान खात्याद्वारे देण्यात आली.

>> पालिका क्षेत्रात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल; काही ठिकाणी जोराचा पाऊस पडू शकतो, असाही अंदाज हवामान खात्याद्वारे वर्तविण्यात आला आहे.

>> आज आणि उद्या या दोन्ही दिवशी नागरिकांनी घरातून बाहेर पडण्याचे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

>> मुंबईतील चौपाट्या तसेच समुद्रकिनाऱ्या नजीकचा परिसर इत्यादी ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये. तसेच या अनुषंगाने मुंबई पोलीस व अग्निशमन दल यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी.

>> भारतीय हवामान खात्याद्वारे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना आणि पाण्याचा वेग लक्षात घेऊन वरळी – वांद्रे परिसराला जोडणाऱ्या राजीव गांधी सागरी सेतूवरील वाहतूक सुरु ठेवण्याचा अगर बंद करण्याचा निर्णय परिस्थितीसापेक्ष घेतला जाईल, असे मुंबई पोलीसांद्वारे सांगण्यात आले.

>> मुंबई परिसरात असणाऱ्या होर्डिंग पैकी जे होर्डिंग्ज धोकादायक परिस्थितीत आढळून येतील ते तातडीने हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.

>> राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या तुकड्या आवश्यक त्या साधन सामुग्रीसह सुसज्ज असल्याची माहिती बैठकीदरम्यान देण्यात आली.

>> रेल्वेच्या स्तरावर आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात आल्या असून उपनगरीय रेल्वे सेवा ही सदर दोन्ही दिवशी सुरू राहील, अशी माहिती रेल्वेद्वारे देण्यात आली.

>> मुंबई मेट्रो, रस्ते विभाग, सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) एम. एम. आर. डी. ए. इत्यादींद्वारे ज्या ज्या ठिकाणी पायाभूत सोयी सुविधांविषयी कामे सुरू आहेत, अशा सर्व ठिकाणी सुयोग्यप्रकारे व तातडीने बॅरिकेड्स लावून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

>> पालिका क्षेत्रातील सखल भागात पाणी साचू नये, यासाठी आवश्यक त्या सर्व ठिकाणी उदंचन संच बसविण्यात आले असून ते सुसज्ज व कार्यतत्पर असल्याची खातरजमा करवून घेण्यात आली आहे

>> महानगरपालिकेचे कर्तव्यावर उपस्थित असणारे कामगार कर्मचारी व अधिकारी यांनी ‘रिफ्लेक्टिव्ह जॅकेट’ परिधान करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

>> बेस्ट इलेक्ट्रिक सप्लाय, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ आणि अदानी इलेक्ट्रिसिटी या विद्युत वितरण करणाऱ्या कंपन्यांनी आपापल्या स्तरावर आवश्यक त्या मनुष्यबळासह आणि हं सामग्री सहज सुसज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. जेणेकरून कोणत्याही परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाल्यास तो लवकरात लवकर पूर्ववत करता येऊ शकेल.

>> पालिकेच्या सर्व 24 विभागांच्या आयुक्तांना त्यांच्या- त्यांच्या स्तरावर आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह सुसज्ज व कार्यतत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

>> समुद्र किनाऱ्यालगत व सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना आवश्यकतेनुसार अन्यत्र हलविणे गरजेचे झाल्यास, त्या दृष्टीने तात्पुरते निवारे यापूर्वीच निश्चित करण्यात आले आहेत. या तात्पुरत्या निवाऱ्यांच्या ठिकाणी अन्न व पाण्याची सुविधा व इतर आवश्यक सुविधा आवश्यकतेनुसार उपलब्ध करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Cyclone Tauktae: BMC gears up to minimise impact in Mumbai)

संबंधित बातम्या:

Cyclone Tauktae Tracker and Updates : रत्नागिरीत मुसळधार पावसाला सुरुवात, अनेक भागात वीजपुरवठा खंडित

Tauktae Cyclone: चक्रीवादळ राज्यात धडकणार नाही, पण समुद्र खवळणार, वाऱ्याचा वेग वाढणार, सावध राहण्याच्या सूचना

Tauktae cyclone | मुंबईच्या 24 वॉर्डांमध्ये जय्यत तयारी, वेळ पडल्यास कोळीवाड्यातील नागरिकांना हलवणार

(Cyclone Tauktae: BMC gears up to minimise impact in Mumbai)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.