दादर, धारावी, परळ, भायखळा, गोरेगाव, मुलुंडमधील पाणी पिण्यास अयोग्य, महापालिकेच्याच अहवालातून धक्कादायक माहिती उघड
मुंबईतील दादर, धारावी, परळ, भायखळा, गोरेगाव आणि मुलुंड या भागात पुरवठा करण्यात येणारे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचं दिसून आलं आहे. (Dadar, Dharavi, Parel among areas that saw rise in water contamination in 2020-21: BMC report)
मुंबई: मुंबईतील दादर, धारावी, परळ, भायखळा, गोरेगाव आणि मुलुंड या भागात पुरवठा करण्यात येणारे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचं दिसून आलं आहे. या भागातील पाणी दूषित असल्याची धक्कादायक माहिती मुंबई महापालिकेच्याच जल विभागाच्या अहवालातून उघड झाली आहे. तसेच हे पाणी प्यायल्याने अतिसारासारखे आजारही बळावण्याची शक्यता या अहवालात वर्तवण्यात आली आहे. (Dadar, Dharavi, Parel among areas that saw rise in water contamination in 2020-21: BMC report)
मुंबई महापालिकेच्या जल विभागाने हा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार दादर, धारावी, परळ, भायखळा, गोरेगाव, मुलुंडमधील पाणी दूषित असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. जुन्या आणि खराब पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनमुळे पाण्याच्या दूषितेत वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. दूषित पाण्यामुळे अतिसार सारखे आजार बळावू शकतात, असंही नमूद करण्यात आलं आहे.
वर्षभरात पाणी दूषित
मुंबई महानगरपालिकेच्या वार्षिक पर्यावरण स्थिती अहवाल (ईएसआर) 2020 च्या आकडेवारीनुसार, दादर, धारावी, परळ, भायखळा, गोरेगाव आणि मुलुंड यासारख्या भागात गेल्या वर्षभरात पिण्याच्या पाण्याच्या दूषिततेत वाढ नोंदवली गेली आहे. या कालावधीसाठी नागरी संस्थेने तपासलेल्या एकूण 29,051 पाण्याच्या नमुन्यांपैकी 275 – 0.94 टक्के नमूने दूषित आढळले आहेत.
ई-कोलाय जीवाणूंमुळे अतिसाराची शक्यता
चाचणीसाठी गोळा केलेल्या एकूण पाण्याच्या नमुन्यांपैकी 275 मध्ये ई-कोलाय जीवाणूंची उपस्थिती दिसून आली आहे. त्यामुळे अतिसार आणि पेचिश सारखे आजार होऊ शकतात. मानकांनुसार, पिण्याचे पाणी ई-कोली मुक्त असायला हवे. दूषित पाणी खराब झालेल्या किंवा जुन्या पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनमुळे झाले असावे, असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
दररोज 3,850 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा
महापालिका मुंबईला दररोज 3,850 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करते. पालिकेचे 27 सेवा जलाशय आहेत. त्यातून गृहनिर्माण सोसायट्या, व्यावसायिक आस्थापना आणि झोपडपट्ट्यांना पाणी पुरवठा केला जातो. मुंबईत 4 लाखांहून अधिक मीटरचे पाणी कनेक्शन आहे.
दादर, धारावीत सर्वाधिक प्रदूषण
पाण्याच्या नमुन्यांमध्ये सर्वाधिक प्रदूषण-3.4 टक्के-जी-उत्तर प्रभाग (दादर, धारावी)मध्ये आढळले आहे. त्यानंतर 2.4 टक्के पी -दक्षिण (गोरेगाव), टी वॉर्ड (मुलुंड) मध्ये 2.3 टक्के आणि एफ-उत्तर (सायन, माटुंगा) मध्ये 2.2 टक्के नमूने दूषित आढळून आले आहेत. गेल्या वर्षी जी-उत्तर मध्ये प्रदूषण 1.5 टक्के होते, तर एफ-उत्तर मध्ये ते 0.1 टक्के होते. त्याचप्रमाणे, पी-दक्षिणमध्ये ते 1.3 टक्के होते. तर टी प्रभागात ते 0.2 टक्के होते असे अहवालात दिसून आले. (Dadar, Dharavi, Parel among areas that saw rise in water contamination in 2020-21: BMC report)
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 18 September 2021 https://t.co/JFFzyAPU8P #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 18, 2021
संबंधित बातम्या:
कुणी तरी आहे तिथे, त्यांना इथे यायचे आहे, उद्धव ठाकरेंचे संकेत तेच; राऊतांनी धुरळा उडवला
तुम्ही कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामे करा, अजितदादांच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या
उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानामागे वेगळाच डाव, नितेश राणेंनी मांडली नवी थिअरी
(Dadar, Dharavi, Parel among areas that saw rise in water contamination in 2020-21: BMC report)