Dadar Train: रेल्वे क्रॉसिंगदरम्यान 2 एक्स्प्रेस एकमेकांवर आदळल्या, इंजिनचा भाग धडकून शॉर्टसर्किटनं खळबळ

मुंबईत दादरजवळ दोन ट्रेनच्या इंजिनची टक्कर झाली असल्याची मोठी समोर येते आहे. नेमकी टक्कर कोणत्या कारणामुळे झाली हे कळू शकलेलं नाही.

Dadar Train: रेल्वे क्रॉसिंगदरम्यान 2 एक्स्प्रेस एकमेकांवर आदळल्या, इंजिनचा भाग धडकून शॉर्टसर्किटनं खळबळ
मध्य रेल्वेच्या वाहतुकीसंदर्भातली मोठी बातमीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 10:26 PM

मुंबई : दादर-पॉन्डिचेरी (Dadar-Pondicherry) या लांब पल्ल्याच्या गाडीचे मागचे तीन डबे रेल्वे रुळावरुन (Derail) घसरल्याची माहिती समोर येते आहे. आतापर्यंत यामध्ये कोणतीही जीवितहानी (No causalities) झालेली नाही. त्याचप्रमाणे कुणालाही दुखापत झाल्याचं वृत्त हाती आलेलं नाही. नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही घटना घडली. गाडी नंबर 11005 असा या गाडीचा नंबर आहे. दरम्यान, सुरुवातीला दोन लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या इंजिनची टक्कर झाली. त्यानंतर हादरे बसल्यामुळे दोन्ही गाड्या जागच्या जागी थांबल्या होत्या.  या घटनेनंतर मध्यरेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. दादर माटुंगा स्थानकादरम्यान, हा सगळा प्रकार घडला. मध्य रेल्वेच्या दादर मार्गावर झालेल्या या घटनेमुळे आता दादर पॉन्डिचेरी या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागतंय.

या गाडीतील प्रवाशांनी रेल्वे रुळांवर उतरून स्टेशन गाठण्यासाठी धावपळ केली. सुरुवातीला नेमकं काय झालंय, हे देखील प्रवाशांना कळायला काही मार्ग नव्हता. या संपूर्ण प्रकाराबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडून आता नेमकी काय माहिती दिली जाते, हे पाहणं महत्त्वाचंय.

पाहा व्हिडीओ :

नेमकं काय घडलं?

गदक एक्स्प्रेस आणि पॉन्डिचेरी एक्स्प्रेस या दोन्हीही गाड्या एकाच ठिकाणी एकाच ट्रॅकवर येत असताना ही घटना घडली. भरधाव वेगानं दोन्ही ट्रेन येत असल्याचं सांगितलं जातंय. पॉन्डिचेरी एक्स्प्रेसचे दोन डेब इंजिनची धडक बसून रुळावरुन खाली घसरले. अत्यंत भीतीदायक अशी ही घटना होती. या घटनेनंतर शॉर्टसर्किट झाल्याचाही दावा काही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

कशामुळे अपघात?

रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे हा सगळा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जातो. दरम्यान, वेग दोन्ही गाड्यांचा फार कमी असल्यानं मोठा अनर्थ टळलाय. तीन ते चार वेळा शॉर्ट सर्किट झालं. दरम्यान, ही धडक झाल्यानंतर प्रवाशांनीही तातडीनं गाडीतून खाली उतरत बाहेर येण्याचा प्रयत्न केला.

ही घटना कळल्यानंतर तातडीनं रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचाहीरी घटनास्थळी दाखल झाले. सध्या या मार्गावरली वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव :

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.