मुंबई : डान्सर गौतमी पाटीलने आपल्या नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. गौतमीचे प्रत्येक कार्यक्रम हाऊसफुल्ल जातात. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होते. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जण तिच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात. एवढेच नव्हे तर गौतमी पाटील हीचा कार्यक्रम आणि राडा हा ठरलेलाच आहे. गौतमी जाते तिथे एवढी गर्दी होते की कार्यक्रम पाहण्यावरून लोकांमध्येच जुंपते. शेवटी तिला कार्यक्रम गुंडाळावा लागतो. गौतमीची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. तिला सबसे कातील गौतमी पाटील असंही संबोधलं जातं. असं असलं तरी गौतमीलाही आता स्पर्धक निर्माण झाली आहे. मयुरी उतेकर असं या डान्सरचं नाव आहे. मयुरीच्या कार्यक्रमांनाही प्रचंड गर्दी होत असते.
मयुरी उतेकरने तिच्या इन्स्टावर तिच्या डान्सचे व्हिडिओ टाकले आहेत. नाद नकोच… असं कॅप्शनही तिने तिच्या व्हिडीओला दिलं आहे. मात्र, तिच्या या डान्सवरून नेटकऱ्यांनी तिच्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. खासकरून तिच्या डान्सच्या स्टेप्स, हावभाव यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मयुरीचे इन्स्टावर 80 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिने व्हिडीओ अपलोड करताच 240 फॉलोअर्सनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
दोन क्वॉर्टर झाल्यावर आमची पोरंपण अशीच नाचतात वरातीत. एकंदर काय तर अत्यंत घाणेरडा प्रकार आहे. लाज वाटू द्या, असं एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने महाराष्ट्राचा हळूहळू बिहार होतोय, अशी टीका केली आहे. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, अशी कमेंट दुसऱ्या एका नेटकऱ्याने केली आहे. लावणीची वाट लावून टाकली, माकड उड्या आहेत, अशा कमेंटही तिच्या इन्स्टावर वाचायला मिळत आहेत. काहींनी तिच्या नृत्याचं समर्थनही केलं आहे. खूप छान अशा प्रतिक्रियाही आहेत. तर गौतमीची कॉपी असंही काहींनी म्हटलं आहे.
मयुरी उतेकर सध्या प्रचंड फॉर्मात आहे. लावणी डान्सर म्हणून तिने अल्पावधीत नाव कमावले आहे. ती मूळची रायगड जिल्ह्यातील पेणची आहे. मयुरी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. आपल्या कार्यक्रमाचे व्हिडिओ ती सातत्याने इन्स्टावर टाकत असते. तिचे इन्स्टावर 80 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.