दाऊद इब्राहिमची 2001 वर्षांपूर्वी घेतली संपत्ती, 23 वर्षांनी आता झाली खरेदी, कारण…
Dawood Ibrahim news: संपत्तीच्या खरेदीनंतरही हेमंत जैन यांना दुकानाचा ताबा मिळाला नाही. त्यासाठी हेमंत जैन यांनी अनेक पत्रे पंतप्रधान कार्यालयास लिहिले. त्याचे उत्तर त्यांना वेळोवेळी मिळाले. परंतु उपनिबंधक कार्यालयात खरेदीची नोंदणी झाली नाही.
Dawood Ibrahim news: कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम यांची संपत्ती उत्तर प्रदेशातील हेमंत जैन यांनी २००१ मध्ये घेतली होती. लिलावातून त्यांनी दाऊद इब्राहिमची दुकान विकत घेतली होती. आता २३ वर्षानंतर १९ डिसेंबर २०२४ रोजी त्या संपत्तीची उपनिबंधक कार्यालयात खरेदी झाली. परंतु अजूनही त्या संपत्तीवर हेमंत जैन यांना मालकी हक्क मिळाला नाही. त्यामुळे हेमंत जैन यांनी आयकर विभाग आणि पोलिसांकडे त्या संपत्तीचा मालकी हक्क मिळण्याची मागणी केली आहे.
दोन लाख भरले
आयकर विभागाने मुंबईतील नागपाडा पोलीस स्टेशन अंतर्गत भाई स्ट्रीट भागात दाऊदची असलेल्या २३ संपत्ती जप्त केल्या होत्या. त्यात एक दुकानही आहे. या संपत्तीचा लिलावासाठी २००१ मध्ये वृत्तपत्रात जाहिरात दिली होती. त्यानंतर फिरोजबाद येथील हेमंत जैन यांनी २० सप्टेंबर २००१ रोजी दोन लाखांत १४४ फुटांची दुकान विकत घेतली. त्यासाठी त्यांनी २० सप्टेंबर २००१ रोजी एक लाख आणि २८ सप्टेंबर २००१ रोजी एक लाख रुपये भरले.
का होत नव्हती खरेदी
संपत्तीच्या खरेदीनंतरही हेमंत जैन यांना दुकानाचा ताबा मिळाला नाही. त्यासाठी हेमंत जैन यांनी अनेक पत्रे पंतप्रधान कार्यालयास लिहिले. त्याचे उत्तर त्यांना वेळोवेळी मिळाले. परंतु उपनिबंधक कार्यालयात खरेदीची नोंदणी झाली नाही. खरेदी न होण्याचे कारण सांगताना हेमंत जैन यांनी सांगितले की, आयकर विभागाकडे असलेली मुळ कागदपत्रे मिळत नव्हती. आयकर विभागाने त्या कागदपत्रांचा शोध सर्वत्र घेतला. परंतु ती मिळाली नाही.
लिलावात मालमत्ता खरेदी केली असेल तर त्याची रजिस्ट्रीही हेमंत जैन यांच्या नावावर झाली नाही. त्यामुळे ते न्यायालयात पोहचले. न्यायालयाच्या आदेशानंतर डिसेंबर २००४ मध्ये २३,१०० रुपये निबंधकांकडे आणि १,२६,६८० रुपये दंडासह मुद्रांक शुल्क म्हणून जमा केले. त्यानंतर १९ डिसेंबर २०२४ रोजी ती खरेदी झाली.