दाऊद इब्राहिमच्या नावे मुख्यमंत्र्यांना फोन, ‘मातोश्री’ उडवण्याची धमकी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान 'मातोश्री' उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. Dawood Ibrahim threatens to blow up CM Uddhav Thackeray Matoshree residence

दाऊद इब्राहिमच्या नावे मुख्यमंत्र्यांना फोन, 'मातोश्री' उडवण्याची धमकी
Follow us
| Updated on: Sep 06, 2020 | 5:27 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान ‘मातोश्री’ उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. दुबईहून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने याबाबतचा फोन आल्याची माहिती  समोर येत आहे. त्यामुळे मातोश्री निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. (Dawood Ibrahim threatens to blow up CM Uddhav Thackeray Matoshree residence)

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांचे वांद्र्यातील खासगी निवासस्थान असलेलं मातोश्री उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आली आहे. दुबईवरुन मातोश्रीवर धमकीचे तीन ते चार फोन आले. त्या फोनवरुन मातोश्री उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने हे फोन केल्याचे समोर येतं आहे.  हे धमकीचे फोन आल्यानंतर मातोश्री निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

मुंबईच्या क्राईम ब्रांचने दिलेल्या माहितीनुसार, रात्री 2 वाजता दुबईवरुन मातोश्रीवर एक फोन आला. या फोनवरील व्यक्तीने दाऊदला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे असल्याचं सांगत कॉल ट्रान्सफर करण्यास सांगितले. मात्र कॉल ऑपरेटरने फोन ट्रान्सफर केला नाही. सध्या याबाबतची चौकशी सुरु आहे.

“मला अजून याबाबतची अधिकृत माहिती मिळालेली नाही. मी मुंबईतील अधिकाऱ्यांकडून याबाबतची माहिती घेत आहे. अधिकृत माहिती असल्याशिवाय बोलणं योग्य नाही. पण शिवसैनिक म्हणून सांगतो, शिवसैनिकांचा श्रद्धास्थान असलेल्या, आमच्या शिवसैनिकांचं मातोश्री हे एक मंदिर आहे. तिथे धमकी देणारा जगाच्या पाठीवर माणूस जन्माला यायचा असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, माझे शिवसैनिक माझं सुरक्षाकवचं आहे. आम्ही देशभरातील शिवसैनिक मातोश्रीचं, उद्धव ठाकरेंचं, ठाकरे कुटुंबांचे त्यांचे रक्षण करु,” अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. (Dawood Ibrahim threatens to blow up CM Uddhav Thackeray Matoshree residence)

छातीचा कोट करुन मातोश्रीचे रक्षण करु – अरविंद सावंत

“मातोश्रीला यापूर्वी अशा अनेक धमक्या आल्या. केसाला धक्का लावण्याची हिंमत नाही. शिवसैनिकांच्या छातीचा कोट करु आणि मातोश्री सुरक्षित राखू. अशा धमक्या भरपूर बघितल्या. उंदरासारखे बिळात लपून धमकी देणार आम्ही भरपूर पाहिले आहेत. पण सरकारनेही याबाबतची गंभीर दखल घेतली पाहिजे,” अशी प्रतिक्रिया खासदार अरविंद सावंत यांनी दिली.

महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस मातोश्रीचं, मुख्यमंत्र्यांचं, त्या मातोश्रीला लागून असलेल्या सर्वांचे रक्षण करतील.  आमचा पूर्ण विश्वास आहे. कोणी काहीही बोलो, याची चौकशी नक्की होईल. फोन करुन घाबरवणं ही पहिली वेळ नाही. असे अनेकदा घडलं आहे. शिवसैनिकांची अभेद्य भिंत कायम त्यांच्यासोबत आहेत, अशी प्रतिक्रिया मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

दाऊद इब्राहिम कोण?

गुन्हेगारी विश्वाचा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमने मुंबई आणि परिसरात अनेक गुन्ह्यांची मालिका उघडली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर हा गुन्हेगारी विश्वाचा बादशाह म्हणून ओळखला जातो. भारतासाठी दाऊद मोस्ट वॉन्टेड आहे. 64 वर्षीय डॉन दाऊद इब्राहिम हा मुंबईवरील 1993 मधील साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आहे.

दाऊदचा जन्म मुंबईतील डोंगरीचा आहे. तो सध्या पाकिस्तानातील कराचीमध्ये राहत असल्याचा दावा केला जातो.  भारत आणि अमेरिकेने 2003 मध्ये दाऊदला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित केले आहे. 1993 च्या बॉम्बस्फोटांमधील भूमिकेबद्दल त्याच्यावर 25 मिलियन अमेरिकन डॉलर्स इतके बक्षीस आहे.

दाऊद आपल्या देशात नसल्याचं सांगत पाकिस्तानने अनेक वेळा हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु कराचीमध्ये त्याच्यावर उपचार होत असल्याचे वृत्त खरे ठरल्यास पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा उघडकीस येईल. (Dawood Ibrahim threatens to blow up CM Uddhav Thackeray Matoshree residence)

संबंधित बातम्या : 

होय, दाऊद इब्राहिम कराचीतच, पाकिस्तानची पहिल्यांदाच कबुली

खरंच दाऊदचा कोरोनाने मृत्यू झालाय का? गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात….

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.