मुंबई : काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणीसाठी फोन आला होता. तीन वेळा संबंधित आरोपीने फोन केला होता. त्यानंतर आता भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांना धमकीचे पत्र आले. यामुळं भाजपच्या (BJP) गोटात चिंता निर्माण झाली आहे. बांद्राचे भाजपचे आमदार आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. निनावी पत्राद्वारे आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. चौपाटीमध्ये फेकून टाकणार, हातपाय तोडणार आणि कुटुंबीयांनाही संपवणार असा आशय या धमकीमध्ये आहे.
आज सकाळी टपालमध्ये सापडलेल्या पत्राची आशिष शेलार यांनी बांद्रा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार केली. धमकी देणाऱ्या अज्ञात इसमाविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आले. बांद्रा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
आशिष शेलार यांच्या कार्यालयातील टपालात एक पत्र आलं. ते पत्र धमकीचं होतं. यामुळं आशिष शेलार यांनी याची तक्रार बांद्रा पोलिसांत केली. धमकी देणारा कोण आहे, हे अद्याप स्पष्ट झालं नाही.
आशिष शेलार यांना आलेलं हे पत्र निनावे आहे. या पत्रात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईतील चौपाटीमध्ये फेकून टाकणार. हातपाय तोडणार आणि कुटुंबीयांनाही संपवणार असा आशय या धमकीमध्ये आहे.
धमकीचे पत्र येताच आशिष शेलार यांनी बांद्रा पोलिसांत तक्रार केली. पत्र निनावी असल्यानं अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
यापूर्वीही आशिष शेलार यांना धमकी आली होती. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात आशिष शेलार यांनी धमकीचा फोन आला होता. फोनवरून अर्वाच्य शब्दात शिविगाळ करण्यात आली होती. तसेच कुटुंबीयांनाही धमकावले होते. त्यावेळी आशिष शेलार यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडं तक्रार केली होती.