Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत 27 तासांचा मेगा ब्लॉक सुरू; मध्य रेल्वे आणि हार्बरवरील किती लोकल, एक्सप्रेस रद्द?; पटापट जाणून घ्या

आज रविवारी चालणाऱ्या वातानुकूलित उपनगरी सेवा उपलब्ध नसतील. बृहन्मुंबई महानगर पालिकेला ब्लॉक प्रभावित भागात पुरेशा बसेस चालवण्याची विनंती केली आहे.

मुंबईत 27 तासांचा मेगा ब्लॉक सुरू; मध्य रेल्वे आणि हार्बरवरील किती लोकल, एक्सप्रेस रद्द?; पटापट जाणून घ्या
मुंबईत 27 तासांचा मेगा ब्लॉक सुरू; मध्य रेल्वे आणि हार्बरवरील किती लोकल, एक्सप्रेस रद्द?; पटापट जाणून घ्याImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 20, 2022 | 9:32 AM

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मशीद स्टेशन दरम्यानच्या कर्नाक उड्डाणपुलाच्या तोडकामासा काल शनिवारी रात्रीपासून सुरू झाले आहे. त्यामुळे रात्रीपासूनच 27 तासांचा मेगाब्लॉक सुरू करण्यात आला आहे. हा 154 वर्ष जुना पूल धोकादायक ठरल्याने उड्डाणपुलाच्या तोडकामास सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवर सीएसएमटी-भायखळा, सीएसएमटी-वडाळा आणि मेल-एक्स्प्रेस कोचिंग यार्डवर तब्बल 27 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आलाय. त्यामुळे या काळात सीएसटीएमहून भायखळ्याच्या दिशेने जाणाऱ्या आणि भायखळ्याहून सीएसटीएमकडे येणारी रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. सीएसएमटी-भायखळा मार्ग 17 तासांनी, तर सीएसएमटी-वडाळा मार्ग 21 तासांनी पूर्ववत होणार आहे.

या रेल्वे सेवा चालू राहणार नाहीत:

अप आणि डाउन हार्बर मार्ग: वडाळा रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप आणि डाउन धिम्या मार्गावर: भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप आणि डाउन जलद मार्गावर: भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

हे सुद्धा वाचा

उपनगरीय गाड्या रद्द:

ब्लॉक कालावधीत उपनगरीय सेवा भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावरील वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान उपलब्ध राहणार नाही.

मुख्य मार्गावरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा भायखळा, परळ, दादर आणि कुर्ला स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरीजनेट होतील. भायखळा, परळ, दादर, कुर्ला ते ठाणे आणि त्यापलीकडे उपनगरीय गाड्या कमी वारंवारतेने चालवल्या जातील

हार्बर लाईनवरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा वडाळा रोड स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरीजनेट केल्या जातील. वडाळा रोड ते कुर्ला आणि त्यापलीकडे उपनगरीय गाड्या कमी वारंवारतेने चालवल्या जातील

आज रविवारी चालणाऱ्या वातानुकूलित उपनगरी सेवा उपलब्ध नसतील. बृहन्मुंबई महानगर पालिकेला ब्लॉक प्रभावित भागात पुरेशा बसेस चालवण्याची विनंती केली आहे.

मेल/एक्स्प्रेस गाड्या रद्द

आज रद्द झालेल्या गाड्या

1) 17617 मुंबई – नांदेड तपोवन एक्सप्रेस

2) 12127 मुंबई – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस

3) 11007 मुंबई – पुणे डेक्कन एक्सप्रेस

4) 12071 मुंबई – जालना जनशताब्दी एक्सप्रेस

5) 12188 मुंबई – जबलपूर गरीबरथ

6) 11009 मुंबई – पुणे-सिंहगड एक्सप्रेस

7) 02101 मुंबई – मनमाड विशेष

8) 12125 मुंबई – पुणे-प्रगती एक्सप्रेस पनवेल मार्गे

9) 11401 मुंबई – आदिलाबाद एक्सप्रेस

10) 12123 मुंबई – पुणे डेक्कन क्वीन

11) 12109 मुंबई – मनमाड पंचवटी एक्सप्रेस

12) 17612 मुंबई – नांदेड राज्यराणी एक्सप्रेस

13) 12111 मुंबई – अमरावती एक्सप्रेस

14) 17411 मुंबई – कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस

15) 11010 पुणे – मुंबई सिंहगड एक्स्प्रेस

16) 12124 पुणे – मुंबई डेक्कन क्वीन

17) 12110 मनमाड – मुंबई पंचवटी एक्सप्रेस

18) 12126 पुणे – मुंबई प्रगती एक्स्प्रेस पनवेल मार्गे

19) 02102 मनमाड – मुंबई स्पेशल

20) 12072 जालना – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस

21) 17057 मुंबई – सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस, निजामाबाद मार्गे

22) 12701 मुंबई – हैदराबाद हुसेन सागर एक्सप्रेस

23) 11008 पुणे – मुंबई डेक्कन एक्सप्रेस

24) 12128 पुणे – मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस

25) 17618 नांदेड – मुंबई तपोवन एक्सप्रेस

दि. 21.11.2022 रोजी गाड्या रद्द

1) 17617 मुंबई – नांदेड तपोवन एक्सप्रेस

2) 12127 मुंबई – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस

3) 11402 आदिलाबाद-मुंबई एक्स्प्रेस

डाउन ट्रेन्सचे शॉर्ट ओरीजनेशन

आज दादर येथून सुटणाऱ्या गाड्या

1) 22177 मुंबई – वाराणसी महानगरी एक्सप्रेस

2) 12051 मुंबई – मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस

3) 22105 मुंबई – पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस

4) 22119 मुंबई-करमळी तेजस एक्सप्रेस

5) 12859 मुंबई – हावडा गीतांजली एक्सप्रेस

6) 12534 मुंबई – लखनऊ जंक्शन पुष्पक एक्सप्रेस

7) 12869 मुंबई – हावडा एक्सप्रेस

8) 22159 मुंबई – चेन्नई सेंट्रल एक्स्प्रेस

9) 11019 मुंबई – भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस

10) 22732 मुंबई – हैदराबाद एक्सप्रेस

11) 22221 मुंबई – निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस

12) 12261 मुंबई – हावडा दुरांतो एक्सप्रेस

13) 12105 मुंबई – गोंदिया विदर्भ एक्सप्रेस

14) 12137 मुंबई – फिरोजपूर पंजाब मेल

15) 12289 मुंबई – नागपूर दुरांतो एक्सप्रेस

16) 22107 मुंबई – लातूर एक्सप्रेस

17) 12809 मुंबई – हावडा मेल नागपूर मार्गे

18) 12322 मुंबई – हावडा मेल प्रयागराज छिवकी मार्गे

19) 22157 मुंबई – चेन्नई एग्मोर एक्सप्रेस

20) 11057 मुंबई – अमृतसर एक्सप्रेस

दि. 21.11.2022 रोजी दादर येथून सुटणाऱ्या गाड्या

1) 22177 मुंबई – वाराणसी महानगरी एक्सप्रेस

दि.20.11.2022 रोजी नाशिक रोड येथून सुटणाऱ्या गाड्या

1) 12139 मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस

पनवेल येथून सुटणाऱ्या गाड्या

1) 10103 मुंबई-मडगाव मांडवी एक्सप्रेस दि. 20.11.2022 रोजी

2) 12133 मुंबई-मंगळुरु जं. एक्सप्रेस दि. 20.11.2022 रोजी

3) 10111 मुंबई – मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस दि. 20.11.2022 रोजी

पुणे येथून आज सुटणाऱ्या गाड्या

1) 11301 मुंबई- केएसआर बेंगळुरू उद्यान एक्स्प्रेस

2) 11029 मुंबई – कोल्हापूर कोयना एक्सप्रेस

3) 16331 मुंबई- तिरुवनंतपुरम एक्सप्रेस

4) 11139 मुंबई- गदग एक्सप्रेस

5) 12115 मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस

अप ट्रेन्सचे शॉर्ट टर्मिनेशन

आज सुटणाऱ्या या गाड्या दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होतील

1) 22120 करमळी – मुंबई तेजस एक्सप्रेस

2) 12052 मडगाव – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस

3) 22106 पुणे – मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस.

पनवेल येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या ट्रेन्स:

1) 10104 मडगाव – मुंबई मांडवी एक्सप्रेस दि. 20.11.2022 रोजी सुटणारी ट्रेन

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे UNCUT भाषण
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे UNCUT भाषण.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठी भाषेचे कौतुक, म्हणाले "मी बोलण्याचा
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठी भाषेचे कौतुक, म्हणाले
'ऑपरेशन टायगर'चा सपाटा, शिंदेंच्या शिलेदाराकडून ठाकरे गटाला मोठ खिंडार
'ऑपरेशन टायगर'चा सपाटा, शिंदेंच्या शिलेदाराकडून ठाकरे गटाला मोठ खिंडार.
'मेरी कुर्सी छिनी गई', मुनगंटीवार म्हणाले, 'पंतप्रधानांची खुर्ची मी..'
'मेरी कुर्सी छिनी गई', मुनगंटीवार म्हणाले, 'पंतप्रधानांची खुर्ची मी..'.
दहावीचा पेपर फुटला, परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी धक्काबुक्की
दहावीचा पेपर फुटला, परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी धक्काबुक्की.
अण्णा हजारे मैदानात, महायुतीतील दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
अण्णा हजारे मैदानात, महायुतीतील दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी.
कॉपीमुक्त अभियानाचा पहिल्याच दिवशी फज्जा, दहावीचा पहिलाच पेपर फुटला
कॉपीमुक्त अभियानाचा पहिल्याच दिवशी फज्जा, दहावीचा पहिलाच पेपर फुटला.
'मला हलक्यात घेऊ नका, जनता त्यांना..', एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार
'मला हलक्यात घेऊ नका, जनता त्यांना..', एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार.
धंगेकरांना धक्का, नव्या टीममधून डावललं; एकनाथ शिंदेंची भेट घेणं भोवलं?
धंगेकरांना धक्का, नव्या टीममधून डावललं; एकनाथ शिंदेंची भेट घेणं भोवलं?.
जरांगे देशमुख कुटुंबाच्या भेटीला, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना थेट फोन
जरांगे देशमुख कुटुंबाच्या भेटीला, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना थेट फोन.