Ajit Pawar: पोलिसांनो, सुटलेली पोटं कमी करा, आर्मीतल्या जवानांसारखा फिटनेस ठेवा; अजितदादांचं आवाहन

आर. आर. पाटील (R.R.Patil) यांनी गृहमंत्री असताना पोलिसांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं होतं. आता काही पोलिसांची पोटं सुटली आहेत. ते गुन्हेगारांचा पाठलाग कसा करतील असा प्रश्न समोर येतो. मुख्यमंत्री साहेब बघा कसे सडपातळ आहेत.

Ajit Pawar: पोलिसांनो, सुटलेली पोटं कमी करा, आर्मीतल्या जवानांसारखा फिटनेस ठेवा; अजितदादांचं आवाहन
पोलिसांनो, सुटलेली पोटं कमी करा, आर्मीतल्या जवानांसारखा फिटनेस ठेवा; अजितदादांचं आवाहनImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 4:05 PM

मुंबई: आर. आर. पाटील (R.R.Patil) यांनी गृहमंत्री असताना पोलिसांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं होतं. आता काही पोलिसांची पोटं सुटली आहेत. ते गुन्हेगारांचा पाठलाग कसा करतील असा प्रश्न समोर येतो. मुख्यमंत्री साहेब बघा कसे सडपातळ आहेत. आम्हाला पोलिसांची सुटलेली पोटं कमी करायची आहेत. मी लहानपणापासून पोलिसांना बघत आलोय. पोलिसांचा धाक आणि दरारा वाटला पाहिजे. पोलीस पहिलवान नको, पण पोलीसच वाटला पाहिजे. पोलिसांनो, सुटलेली पोटं कमी करा. आर्मीतील जवानांसारखा फिटनेस ठेवा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी केलं. पोलिसांच्या 112 हेल्पलाईन आणि सीसीपीडब्ल्यूसी प्रणालीचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अजित पवार बोलत होते. कसाबने केलेला हल्ला अजूनही आपण विसरु शकत नाही. ते तयारीने घुसले होते. त्यावेळी तुकाराम ओंबळे यांनी त्याला कसाबसा पकडून ठेवले होते. त्यात त्यांना प्राण गमवावा लागला होता. साडेतीन हजार वाहन आपण उपलब्ध करून दिली आहेत, अशी माहिती अजितदादांनी दिली.

महाराष्ट्रातील जनतेने नेहमीच पोलिसांना विश्वास दिला आहे. कोविड काळात सक्षमपणे पोलीसांनी काम केलं आहे. डायल 112 साठी वाहन कमी पडतात यासाठी जिल्हा नियोजनमधील निधी दिला जाईल. पोलिसांच्या घरांचा प्रश्न आहे तो मार्गी लावायचा आहे. मागील सरकारच्या काळात हा निर्णय घेतला होता. मात्र त्याच्या अंमलबजावणीसाठी एवढा वेळ का लागतो याची जबाबदारी घेतली पाहिजे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत मात्र तुमच्या विश्वासााला डाग लागता कामा नये, असं अजित पवार म्हणाले.

हिंदी चित्रपटातील पोलिसांसारखं वागू नका

हिंदी चित्रपट दाखवले जात होते तस काही पोलिस अधिकारी वागतात. तसं होता कामा नये. पारदर्शक कारभार असला पाहिजे. दोन नंबरचे धंदे बंद झाले तर कर वाढू शकतो. त्यातून वाढलेला निधी गृह खात्याला देता येईल. एक्साईज आणि पोलीस विभाग एकत्र बसून यावर विचार करू. गृहमंत्री यांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. जर एखादी व्यक्ती चुकीची वाटत असेल तर ती ओळखा आणि आपल्या खात्याची बदनामी टाळा, असं आवाहनही त्यांनी केलं.

फोन केल्यावर ठिकाणही समजणार

डायल 112 प्रकल्पाच उद्घाटन आपण करत आहोत. ही सेवा नागरिकांना अपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत मिळेल. 24 तास ही सेवा असणार आहे. 100 नंबरला फोन केला तर कुठून फोन आला हे लगेच समजत नव्हतं. मात्र 112 मध्ये ठिकाणही समजणार आहे. व्यक्त होणं आणि शेअर करणं हे सोशल मीडियावरती अनेकदा महागात पडतं. जनतेच्या मनात पोलिसांच्या मनात विश्वास आणि दरारा निर्माण करणं महत्वाचं आहे, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

विद्यावाचस्पती नको, डॉक्टरच शब्द ठीक आहे, मराठी भाषा भवनाच्या कार्यक्रमात Ajit Pawar यांची टोलेबाजी

CM Uddhav Thackeray: भाषा शिकणं गुन्हा नाहीये, पण मातृभाषेचा न्यूनगंड असता कामा नये; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ठणकावले

दान गुप्त ठेवा उघड़ करू नका ईडी लागते, नाना पटोले यांची ईडीच्या कार्यपद्धतीवर टीका

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.