अपात्रतेच्या निकालाला काहीच तास शिल्लक असताना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हालचाली वाढल्या

शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरील निकाल जाहीर होण्यास अवघे काही तास शिल्लक असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी 'वर्षा' निवासस्थानी दाखल झाले आहेत. याशिवाय राज्याच्या नव्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यादेखील 'वर्षा' बंगल्यावर दाखल झाल्या आहेत.

अपात्रतेच्या निकालाला काहीच तास शिल्लक असताना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हालचाली वाढल्या
Follow us
| Updated on: Jan 09, 2024 | 10:20 PM

निवृत्ती बाबर, Tv9 मराठी, मुंबई | 9 जानेवारी 2024 : शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाच्या एक दिवस आधी पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत असल्याची माहिती मिळत आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल जाहीर करणार आहेत. पण त्याआधी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याच्या नव्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या ऐतिहासिक निकालाचं वाचन करणार आहेत. या निकालानंतर राज्यात कुठेही कायदा आणि व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये अशी चर्चा या बैठकीत होण्याची शक्यता आहे. आमदार अपात्रतेच्या निकालानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये संघर्ष उफाळू नये, यासाठी काळजी घेतली जाणार आहे. याचबाबत पोलीस अधिकाऱ्यांना सरकारकडून काही सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे.

विधानसभा अध्यक्ष काय निर्णय देणार?

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दीड वर्षांपासून राजकीय अस्थिरता निर्माण झालीय. शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून ही अस्थिरता निर्माण झालीय. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टातही दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला. सुप्रीम कोर्टाने याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना बहाल केला होता. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार, राहुल नार्वेकर यांनी याप्रकरणी सुनावणी घेतली. नार्वेकरांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. दोन्ही बाजूचं लेखी म्हणणं ऐकून घेतलं. दोन्ही बाजूच्या आमदारांची उलटसाक्ष देखील नोंदवण्यात आली. त्यानंतर उद्या अंतिम निकाल जाहीर होणार आहे. पण त्याआधी ते काय निकाल जाहीर करणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उद्या सकाळी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यानंतर मु्ख्यमंत्री दुपारी नियोजित हिंगोलीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. एकीकडे आमदार अपात्रतेच्या निकालावर उद्या वाचन होणार आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडेही राज्याचं लक्ष असणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.