नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी व्यवहार तर तुम्ही गृहमंत्री असताना कारवाई का नाही?, फडणवीसांनी 5 शब्दात विषय संपवला

उपस्थित पत्रकाराने फडणवीसांना अडचणीत आणणारा प्रश्न विचारला. 2014 ला आपण गृहमंत्री होतात, मग आपणाला हा व्यवहार माहिती असूनही आपण त्यावेळी कारवाई का केली नाही? असा सवाल एका पत्रकाराने विचारला. पत्रकाराच्या प्रश्नाचं फडणवीसांनी 5 शब्दात उत्तर देऊन विषय संपविला.

नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी व्यवहार तर तुम्ही गृहमंत्री असताना कारवाई का नाही?, फडणवीसांनी 5 शब्दात विषय संपवला
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 2:09 PM

मुंबई :  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्यावर अंचरवर्ल्डशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.  1993 च्या मुंबई बॉम्बब्लास्टमधील आरोपीकडून नवाब मलिक यांनी कोट्यवधींची जमीन केवळ 20 लाखांत विकत घेतली, ती कशी? आणि मुंबईकरांच्या चिंधड्या उडवणाऱ्या व्यक्तींशी मलिकांनी व्यवहार केला कसा? असे सवाल फडणवीसांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केले. त्याचवेळी उपस्थित पत्रकाराने फडणवीसांना अडचणीत आणणारा प्रश्न विचारला. 2014 ला आपण गृहमंत्री होतात, मग आपणाला हा व्यवहार माहिती असूनही आपण त्यावेळी कारवाई का केली नाही? असा सवाल एका पत्रकाराने विचारला. पत्रकाराच्या प्रश्नाचं फडणवीसांनी 5 शब्दात उत्तर देऊन विषय संपविला.

फडणवीसांनी 5 शब्दात विषय संपवला

2014 ला तुमचं सरकार होतात, तुम्ही मुख्यंमंत्री आणि गृहमंत्री होतात, मग मलिकांनी अंडरवर्ल्डकडून जमीन घेतली हे माहित असूनही तुम्ही कारवाई केली नाही?, असा धडक सवाल उपस्थित एका पत्रकाराने विचारला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केवळ 5 शब्दात उत्तर दिलं, ‘त्यावेळी माहिती नव्हती, आता मिळालीय’, एवढ्या 5 शब्दात त्यांनी पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर दिलं.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “2005 नंतर किती गृहमंत्री झाले, मग त्यांनी का कारवाई केली नाही?, असं तुम्ही विचारणार का?. त्यावेळी कारवाई केली नाही कारण त्यावेळी माझ्याकडे माहिती नव्हती. माझ्याकडे ज्यावेळी माहिती आली त्याचवेळी मी माहिती आपल्यासमोर आणलीय”

फडणवीसांनी नवाब मलिकांवर कोणते आरोप केले?

देवेंद्र फडणवीस यांनी अर्ध्या तासाची पत्रकार परिषद नवाब मलिक यांच्यावर आरोपांचे बॉम्बगोळे फेकले. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींकडून नवाब मलिक यांनी कोट्यवधी रुपयांची जमीन अगदी कवडीमोल भावात घेतली. मुंबईच्या चिंधड्या उडवणाऱ्या अंडरवर्ल्ड आरोपींकडून मलिकांनी जमीन कशी काय घेतली, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. तसंच आणखी 4 व्यवहार देखील मलिकांनी अंडरवर्ल्डशी केलेत, असा खळबजनक दावा त्यांनी केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले,  “कुर्ला येथे तीन एक जमीन 1 लाख 23 स्क्वेअर फुट जमीन होती. ही जमीन एलबीएस रोडवर आहे. या जमिनीची नोंदणीनोंदणी सॉलिडस नावाच्या कंपनी सोबत झाली आहे. या जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी सलीम खान याच्या नावावर आहे. विक्री सरदार शहा वली याच्या नावावर आहे. सॉलिडस कंपनी नवाब मलिक यांच्या परिवाराची आहे. या कागदपत्रावरील सही फराज मलिक यांची आहे. 2019 पर्यंत नवाब मलिकही सॉलिडसमध्ये भागीदार होते. मात्र, मंत्री होणार असल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांनी मुंबई बॉम्बस्फोटात सहभागी असणाऱ्या लोकांशी व्यवहार केला. सलीम पटेल आणि सरदार शहा वली यांना मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात दोषी ठरवून शिक्षा होणार याची चाहूल लागल्यानंतर ही जमीन कमी भावात मलिक यांना विकण्यात आली”  अ्सा दावा फडणवीस यांनी केला.

(Devendra Fadnavis allegations 1993 Mumbai Bomb Blast Who is Sardar shah wali khan and his connection with Nawab Malik)

हे ही वाचा :

नवाब मलिकांच्या कुटुंबीयांकडून अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांकडून जमीन खरेदी, देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक आरोप

अखेर फडणवीसांनी बॉम्ब फोडला! मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांकडून जमीन का खरेदी केली? फडणवीसांचा मलिकांना सवाल

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.