BREAKING : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, शिंदे-फडणवीस उद्या अचानक दिल्ली दौऱ्यावर, घडामोडींना वेग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.

BREAKING : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, शिंदे-फडणवीस उद्या अचानक दिल्ली दौऱ्यावर, घडामोडींना वेग
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 13, 2022 | 8:03 PM

गिरीश गायकवाड, मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सीमावादाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शिंदे आणि फडणवीस हे उद्या दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. अमित शाह यांच्यासोबत शिंदे-फडणवीसांची महत्त्वाची बैठक होणार आहे. विशेष म्हणजे या बैठकीला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलंय.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून दोन्ही राज्यांमध्ये तणाव निर्माण झालाय. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मध्यस्थीनंतर कर्नाटकाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. एकनाथ शिंदे आणि फडणवीस उद्याच्या बैठकीसाठी उद्या सकाळी 11 वाजता दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

हे सुद्धा वाचा

सीमावादावर तणाव वाढल्यानंतर अहमदाबादच्या विमानतळावर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमानिमित्ताने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस काल गुजरातला गेले होते. या कार्यक्रमाला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे देखील उपस्थित होते. या दरम्यान अहमादाबाद विमानतळातील विशेष कक्षात शिंदे-फडणवीस आणि बोम्मई यांच्यात भेट झाल्याची माहिती समोर आली होती.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरुन तणाव सुरु झाल्यानंतर बोम्मई आणि शिंदे यांच्यातील ही पहिलीच भेट होती. या भेटीत सीमावादावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. पण नेमकी काय चर्चा झाली, याबाबत माहिती समोर आली नव्हती.

दरम्यान, शिंदे आणि बोम्मई यांच्या भेटीवर चर्चांना उधाण आल्यानंतर संबंधित प्रकरणाची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत गेली. त्यानंतर उद्या अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली या विषयावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावल्याची माहिती समोर आलीय.

महाराष्ट्राच्या खासदारांनीही घेतली होती अमित शाहांची भेट

सीमावादाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्राच्या खासदारांच्या शिष्ठमंडळाने देखील तीन दिवसांपूर्वी अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान अमित शाह यांनी या प्रकरणावर मध्यस्थी करण्याची आणि तोडगा काढण्याची विनंती केली होती.

महाविकास आघाडीचा मुंबईत महामोर्चा

सीमावादावरुन महाविकास आघाडीदेखील चांगलीच आक्रमक झाली आहे. सीमावादाच्या मुद्द्यावर शिंदे-फडणवीस सरकार गप्प असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येतोय. त्यामुळे या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी येत्या 17 डिसेंबरला मुंबईत महामोर्चा काढून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहे. या महामोर्चात अनेक मुद्द्यांवरुन शिंदे फडणवीस सरकारला घेरण्यात येण्याची चर्चा आहे.

महाविकास आघाडीकडून महामोर्चाची तयारी सुरु असताना आता दिल्लीत अमित शाहांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यामुळे या सर्व घडामोडींकडे महाराष्ट्राच्या जनतेचं बारीक लक्ष असणार आहे.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.