जरांगे यांच्या मागे कोण…सर्व गोष्टी बाहेर येऊ लागल्या, देवेंद्र फडणवीस यांचा रोख कोणाकडे

Devendra Fadnavis | रात्री जाऊन मनोज जरांगे यांना परत आणणारे कोण आहेत. कोणाकडे बैठक झाली हे आरोपी सांगत आहेत. आरोपी जबाबात सांगितले की, आम्हाला दगडफेक करा, असे सांगितले. ज्या पोलिसांववर दगडफेक झाली ते पोलीस आपले नाही का?

जरांगे यांच्या मागे कोण...सर्व गोष्टी बाहेर येऊ लागल्या, देवेंद्र फडणवीस यांचा रोख कोणाकडे
devendra fadnavis
Follow us
| Updated on: Feb 27, 2024 | 11:21 AM

मुंबई, दि. 27 फेब्रुवारी 2024 | विधानसभेत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे जोरदार प्रतिसाद उमटले. या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्या मागे कोण आहे? त्याची सर्व सखोल चौकशी होणार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी एक, एक गोष्टी बाहेर येऊ लागल्या आहेत. चौकशीतून सर्व समोर येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांचा रोख कोणाकडे? याबाबत चर्चा होऊ लागली आहे.

काय म्हणाले फडणवीस

देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, रात्री जाऊन मनोज जरांगे यांना परत आणणारे कोण आहेत. कोणाकडे बैठक झाली हे आरोपी सांगत आहेत. आरोपींनी जबाबात सांगितले की, आम्हाला दगडफेक करा, असे सांगितले. ज्या पोलिसांववर दगडफेक झाली ते पोलीस आपले नाही का? आपल्या पोलिसांना मारायचे आणि आपण शांत बसायचे का? आतापर्यंत मराठा समाजाचे मोर्च शांततेत झाले. परंतु बीडमध्ये हिंसक आंदोलन झाले. त्यामागे कोण आहे, याचा शोध घेतला जाणार आहे.

जरांगे यांचे कोणासोबत फोटो

फडणवीस म्हणाले की, राजकारण आपल्या स्तरावर चालत राहणार आहे. पण आज समाजाला विघटन करण्याचे काम चालले. जरांगे यांचे कोणासोबत फोटो निघत आहे. कोणाच्या पैसा त्याच्यामागे आहे. यासंदर्भात एक एक गोष्टी बाहेर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतात आणि तुम्ही कोणाची आयामाय काढणार असेल तर कसे चालणार.

हे सुद्धा वाचा

बोलविता धनी समोर येणार

अध्यक्षांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहे. त्यानुसार आता चौकशी होणार आहे. माझी जरांगे यांच्यासंदर्भात तक्रार नाही. पण जरांगे यांच्या पाठीमागे बोलवतो धनी कोण आहे, ही स्क्रीप्ट काही लोक रोज बोलतात. आता ती स्क्रीप्ट जरांगे बोलत आहे. संभाजीनगर, पुणे, मुंबईत वॉर रुम कोणी उघडली. ही सर्व माहिती मिळू लागली आहे. सर्व चौकशी करुन हे षडयंत्र बाहेर आणू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'.
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले...
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले....
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त.
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र.
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले....
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले.....
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?.
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र.
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?.