Devendra Fadnavis : पोलिसांच्या वाहनातून निवडणुकीसाठी रसद? शरद पवारांच्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस मैदानात; असा केला पलटवार

Devendra Fadnavis attack on Sharad pawar : विधानसभा निवडणुकीच्या राजकारणात लोकसभेतील मुद्दा विरोधकांनी आता पु्न्हा उचलून धरला आहे. पोलीसांच्या वाहनातून निवडणुकीसाठी रसद पुरवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला आहे. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis : पोलिसांच्या वाहनातून निवडणुकीसाठी रसद? शरद पवारांच्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस मैदानात; असा केला पलटवार
Follow us
| Updated on: Nov 02, 2024 | 2:52 PM

विधानसभा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. लोकसभा निवडणुकीतील मतदारांना पैशा वाटप करण्यासाठी सरकारी यंत्रणेचा वापर होत असल्याचा मुद्दा विरोधकांनी विधानसभेच्या निवडणुकीतही उचलून धरला आहे. यापूर्वी संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून रसद पुरवल्याचा आरोप लोकसभा निवडणुकीदरम्यान केला होता. पोलीसांच्या वाहनातून निवडणुकीसाठी रसद पुरवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला आहे. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले फडणवीस

शरद पवार यांच्या या गंभीर आरोपानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रिंगणात उतरले आहेत. शरद पवार यांच्या काळात असं चालायचं, आता त्यांना तसा भास होत असेल. आमच्या काळात तर असं काही होत नाही, असा पलटवार फडणवीस यांनी त्यांच्यावर केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रसद कुणाची कोंडी करणार आणि कुणाचे बिंग फुटणार हे लवकरच समोर येईल.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांचा आरोप काय?

नाशिक येथील उमेदवारांसाठी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवल्याप्रकरणात शिवसेना शिंदे गटावर महाविकास आघाडी तुटून पडली आहे. संजय राऊत यांनी तोंडसूख घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे नेते शरद पवार यांनी आज महायुतीवर गंभीर आरोप केला. या सरकारचं वैशिष्ट्ये आहे. विमानाने एबी फॉर्म पाठवले जातात. तर पोलीस दलाच्या गाड्यातून महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवली जात आहे, असा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

जाहीरपणे सांगितले असते पण…

मी गोष्ट जाहीरपणे सांगणार होते, असे शरद पवार म्हणाले. पण माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांचे नाव जाहीर करू नये अशी गळ घातल्याचा दावा पवार यांनी केला. बारामतीमध्ये पाडव्यानिमित्त आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हा बॉम्ब टाकला. यापूर्वी लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून अधिकाऱ्यांनी पैशांची रसद पुरवल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावेळी पण एकच खळबळ उडाली होती. आता या मुद्दावरून राजकारण तापण्याची चिन्हं आहेत.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.