महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी खूप मोठ्या घोषणा, जनतेला काय-काय मिळणार? वाचा सविस्तर

देवेंद्र फडणवीसांनी बजेटमधून विद्यार्थ्यांना चांगलंच खूश केलंय. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृतीत मोठी वाढ झालीय. तर महिलांना एसटीत प्रवासासाठी 50 टक्के सवलत दिलीय. याशिवाय फडणवीसांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी खूप मोठ्या घोषणा, जनतेला काय-काय मिळणार? वाचा सविस्तर
DEVENDRA FADNAVIS Image Credit source: TV9 NETWORK
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 11:14 PM

मुंबई : अर्थमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आपला पहिला अर्थसंकल्प मांडला. शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी मोठ्या घोषणा बजेटमधून करण्यात आल्यात. बजेटमध्ये सर्वसामान्यांसाठी नेमकं काय काय आहे? याबाबतची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. विशेष म्हणजे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बजेटवरुन, विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आलेत. विरोधकांना फडणवीसांनी मांडलेलं बजेट आवडलं नाही. पण शेतकरी, महिला आणि सर्वसामान्यांसाठी महत्वाच्या घोषणा झाल्यात. मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना 6 हजार रुपये वर्षाला मिळायचे. त्यात शिंदे-फडणवीस सरकारनं 6 हजारांची भर घातलीय.

शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये नेमक्या काय-काय घोषणा?

1) केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी वर्षाला अतिरिक्त 6000 रुपये मिळणार 2) शेतकऱ्यांचा पीकविमा राज्य सरकार भरणार 3) एक रुपया भरुन शेतकऱ्यांना पीकविमा घेता येणार 4) शेतकऱ्यांच्या नुकसानाचे ई-पंचनामे करणार 5) धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 15 हजार रुपयांची मदत देणार 6) आता मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचनासाठी 1 हजार कोटी 7) मागेल त्याला शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर 8) 200 कोटी रुपयांच्या भांडवलासह कोकणासाठी काजू बोर्ड 9) कोकण, चंदगड आणि आजरा इथं काजू फळ विकास योजना 10) गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राज्य सरकार राबवणार 11) अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांना आता 2 लाख रुपयांपर्यंत लाभ 12) 3 वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणणार 13) नागपुरात कृषी सविधा केंद्र, बुलडाण्यात संत्रा प्रक्रिया प्रकल्प 14) नागपुरात डॉ.पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र

विद्यार्थ्यांना चांगलंच खुश करण्याचा प्रयत्न

हे सुद्धा वाचा

देवेंद्र फडणवीसांनी बजेटमधून विद्यार्थ्यांना चांगलंच खूश केलंय. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृतीत मोठी वाढ झालीय. तर महिलांना एसटीत प्रवासासाठी 50 टक्के सवलत दिलीय.

सर्वसामान्यांसाठी बजेटमध्ये काय-काय घोषणा?

1) 5 वी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांना 1 हजार वरुन 5 हजार, 8 वी ते 10 वी विद्यर्थ्यांना 1500वरुन 7500 रुपये शिष्यवृती मिळणार 2) प्राथमिक, उच्च प्राथमिक शिक्षणसेवकाचं मानधन 6 हजार वरुन 16 हजार 3) माध्यमिक शिक्षणसेवकांचं मानधन 8 हजार वरुन 18 हजार रुपये 4) उच्च माध्यमिक शिक्षणसेवकांचं मानधन 9 हजार वरुन 20 हजार रुपये 5) मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना नव्या स्वरुपात असेल 6) पिवळ्या, केशरी रेनकार्डधारक कुटुंबातील मुलींना जन्मानंतर 5 हजार रुपये मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर 75 हजार मिळणार 7) महिलांना एसटीच्या प्रवासात सरसकट 50 % सवलत 8) आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 हजार रुपये 9) अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10 हजार रुपये 10) महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत 5 लाखांपर्यंत उपचार घेता येणार 11) संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेअंतर्गत 1 हजार वरुन 1500 रुपये मिळणार 12) मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत, इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांत 10 लाख घरं 13) महाराष्ट्रात 14 ठिकाणी मेडिकल कॉलेज 14) जनजीवन मिशन अंतर्गत नळजोडणी, स्वच्छतेसाठी 20 हजार कोटी 15) रस्ते आणि पुलांसाठी 14 हजार 225 कोटी रुपये 16) मुंबईत आणखी 50 किलोमीटर मेट्रोचं जाळं वाढवणार 17) मुंबई मेट्रो 10 साठी 4476 कोटी, मुंबई मेट्रो 11साठी 8739 कोटी 18) नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6708 कोटी

बजेटवरुन राजकीय कुरघोडी

विरोधकांचा फडणवीसांनी करेक्ट कार्यक्रम केल्याचं मुख्यमंत्री म्हणतायत. पण बजेटवर पुस्तक लिहूनही, बजेट कसं मांडावं हे फडणवीसांना माहिती नाही अशी बोचरी टीका अजितदादांनी केलीय. सत्ताधारी आपल्या बजेटला शानदार बजेट सांगतायत. तर विरोधकांनी चुनावी जुमला म्हटलंय. आता ज्या घोषणा झाल्यात, त्या प्रत्यक्षात उतरवण्याचं आव्हानही सरकार समोर असेल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.