ठाकरे सरकारवर देवेंद्र फडणवीसांचा डेटाबॉम्ब; पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश

या माहितीच्याआधारे पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. | Devendra Fadnavis

ठाकरे सरकारवर देवेंद्र फडणवीसांचा डेटाबॉम्ब; पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 12:58 PM

मुंबई: परमबीर सिंह यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर पत्र लिहून गंभीर आरोप केल्यानंतर आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर डेटाबॉम्ब टाकला. देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांसमोर पोलीस दलात बदल्यांसाठी सुरु असलेल्या रॅकेटचा तपशील मांडला. गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी ही सगळी माहिती पोलीस महासंचालकांना दिली होती. त्यानंतर ही माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली. मात्र, त्यावर कारवाई होणे तर सोडाच पण उलट रश्मी शुक्ला यांची बढती रोखण्यात आली, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. (Devendra Fadnavis Detabomb on Thackeray govt)

ते मंगळवारी मुंबईतील पत्रकारपरिषेदत बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्याकडे पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटविषयी संवेदनशील माहिती असल्याचा दावा केला. ही माहिती खूपच संवेदनशील असल्याने मी ती प्रसारमाध्यमांना देऊ शकत नाही. ही माहिती घेऊन मी केंद्रीय गृहखात्याच्या सचिवांना भेटणार आहे. या माहितीच्याआधारे पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीसांकडे कोणतीह स्फोटक माहिती?

गुप्तचर विभागाच्या आयुक्तांना पोलीस दलात बदल्यांसाठी रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्यासाठी थेट अधिकाऱ्यांशी बोलणी सुरु होती. ही बाब गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलीस महासंचालकांना ही माहिती दिली.

पोलीस महासंचालकांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला विनंती करून या सर्व लोकांच्या कॉल इंटरसेप्शनची परवानगी मागितली. ही परवानगी मिळाल्यानंतर कॉल रेकॉर्डिंगमध्ये स्फोटक माहिती समोर आली. बदल्यांच्या रॅकेटमध्ये अनेक मोठे अधिकारी आणि राजकीय लोकांची नावं समोर आली.

रश्मी शुक्ला यांनी 25 ऑगस्ट 2020 रोजी ही माहिती पोलीस महासंचालकांना दिली. 26 तारखेला पोलीस महासंचालकांनी ही माहिती तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवली. या सगळ्या प्रकाराची सीआयडीकडून चौकशी होणे गरजेचे आहे, असे पोलीस महासंचालकांनी आपल्या अहवालात म्हटले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याविषयी समजल्यानंतर त्यांनीही चिंता व्यक्त केली. मात्र, यावर कारवाई करण्याऐवजी हा अहवाल त्यांनी गृहमंत्रालयाकडे पाठवला. ही माहिती बघितल्यानंतर गृहमंत्रालयाने कारवाई करणे सोडाच पण गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्तांनाच शिक्षा केली. त्यांना अपेक्षित बढती मिळाली नाही. त्यानंतर गुप्तचर विभागाच्या डेटामध्ये नमूद केल्याप्रमाणेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. संबंधित बातम्या : 

अनिल देशमुख 15 फेब्रुवारी रोजी काय करत होते?; फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट

एटीएसला आणखी एक कार दमनमध्ये सापडली; वाझेंचे ‘कार’नामे उघड होणार?

(Devendra Fadnavis Detabomb on Thackeray govt)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.