AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सत्य का लपवताय? ठाकरे सरकारला फडणवीसांचा सवाल

पुणे पोलिसांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे. या प्रकरणातील तथ्य बाहेर काढलं पाहिजे. जे काही सत्य असेल बाहेर आणायला हवं, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सत्य का लपवताय? ठाकरे सरकारला फडणवीसांचा सवाल
देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 1:46 PM

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आता राजकारण तापताना दिसत आहे. या प्रकरणात ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याचं नाव जोडलं जात असल्यामुळे भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. पुणे पोलिसांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे. या प्रकरणातील तथ्य बाहेर काढलं पाहिजे. जे काही सत्य असेल बाहेर आणायला हवं, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.(Devendra Fadnavis demands immediate action in Pooja Chavan suicide case)

मूळची परळीची असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीनं रविवारी पुण्यात आत्महत्या केली. पूजानं विदर्भातील एका मंत्र्यासोबतच्या संबंधातून आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. हा मंत्री शिवसेनेचाच असल्याचीही चर्चा सुरु आहे. अशावेळी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलंय. भातखळकर यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री ‘राठोडगिरी’ सहन करणार का? असा प्रश्न विचारलाय. भातखळकरांचं हे ट्वीट म्हणजे त्यांनी शिवसेनेच्या कुठल्या मंत्र्याकडे तर इशारा केला नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. तसंच संबंधित मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही भातखळकर यांनी केलीय.

पूजा चव्हाणची आत्महत्या मंत्र्यामुळे?

पूजा चव्हाणनं गेल्या रविवारी मध्यरात्रीनंतर पुण्यात आत्महत्या केली आहे. ही घटना महंमदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीत घडली आहे. पूजा चव्हाणनं विदर्भातल्या एका मंत्र्यासोबतच्या प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची चर्चा होती. त्याची चौकशी करा म्हणून भाजपच्या पुण्यातल्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षांनी आयुक्तांना निवेदनही दिलं आहे. पण या प्रकरणातील मंत्र्याचं नाव आतापर्यंत कुठेही समोर आलेलं नव्हतं. ना ते तक्रारीत आहे ना, कुठे एफआयआरमध्ये. पण आता भाजपकडून त्या मंत्र्याचं नाव समोर आणलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे.

शिवसेनेची भूमिका काय?

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अजून तरी शिवसेनेनं कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. पण भाजपा ज्या पद्धतीनं हे प्रकरण आता समोर मांडतय ते पहाता शिवसेनेची प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

मुळची परळीची असलेली 22 वर्षाची पुजा चव्हाण पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. रविवारी मध्यरात्री 1 च्या आसपास तिनं सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच पुजानं स्वत:ला संपवल्याचं बोललं जाऊ लागलं. पण पुजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज असलेलं काही सापडलेलं नाही. पोलीसांनीही तशी काही माहिती दिलेली नाही.

संबंधित बातम्या :

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी भाजप आक्रमक, संबंधित मंत्र्याचं ‘राठोडगिरी’ असं नाव घेत पहिल्यांदाच थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान

परळीची तरुणी, पुण्यात आत्महत्या, विदर्भातल्या मंत्र्याचं कनेक्शन? चौकशीसाठी भाजप आक्रमक

Devendra Fadnavis demands immediate action in Pooja Chavan suicide case

ऑपरेशन सिंदूरनंतर पाक पुन्हा हादरला, लाहोरमध्ये स्फोटाचे आवाज; घडल काय
ऑपरेशन सिंदूरनंतर पाक पुन्हा हादरला, लाहोरमध्ये स्फोटाचे आवाज; घडल काय.
अब पाकिस्तान का जवाब... घुसून मारल्यानंतर बिलावल भुट्टोचा तिळपापड
अब पाकिस्तान का जवाब... घुसून मारल्यानंतर बिलावल भुट्टोचा तिळपापड.
हा होता पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार, नाव-फोटो समोर, बघा कोणाशी कनेक्शन?
हा होता पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार, नाव-फोटो समोर, बघा कोणाशी कनेक्शन?.
भारताने मोठी चूक केली, प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा बदला... पाककडून धमकी
भारताने मोठी चूक केली, प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा बदला... पाककडून धमकी.
सदावर्ते राज ठाकरेंवर भडकले, पाकिस्तानी खाज, मुझे ये नही बोलना की...
सदावर्ते राज ठाकरेंवर भडकले, पाकिस्तानी खाज, मुझे ये नही बोलना की....
OperationSindoor:एअर स्ट्राईकची कहाणी जगाला सांगणाऱ्या त्या दोघी कोण?
OperationSindoor:एअर स्ट्राईकची कहाणी जगाला सांगणाऱ्या त्या दोघी कोण?.
ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकची मस्ती जिरेना... पंतप्रधानांचा कांगावा सुरूच
ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकची मस्ती जिरेना... पंतप्रधानांचा कांगावा सुरूच.
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.