Amit Shah: भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर? जनतेच्या हितासाठीच फडणवीसांचा उपमुख्यमंत्री होण्याचा निर्णय, नड्डांपाठोपाठ अमित शाहांचंही ट्विट

देवेंद्र फडणवीस यांनी मी मंत्रिमंडळाच्या बाहेर असेन सांगताच अनेकांना तो धक्का होता. मात्र त्यानंतर काही वेळातच भाजपच्या जे. पी. नड्डा आणि अमित शहा यांनी ट्विट करत त्यांना उपमुख्यमंत्री होण्याचा त्यांनी निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

Amit Shah: भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर? जनतेच्या हितासाठीच फडणवीसांचा उपमुख्यमंत्री होण्याचा निर्णय, नड्डांपाठोपाठ अमित शाहांचंही ट्विट
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 7:49 PM

मुंबईः मुंबई-सूरत-गुवाहाटा-गोवा आणि पुन्हा मुंबई असा प्रवास करणाऱ्या बंडखोर आमदारांच्या (Rebel MLA) नाट्यनंतर आता हा बंडखोरीचा प्रवास समाप्त होण्याच्या मार्गावर आहे. गोव्याहून एकनाथ शिंदे मुंबईमध्ये पोहचल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठक झाल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात आले. एका सच्चा शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले म्हणून आनंद साजरा होत असतानाच पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले होते, की मी मंत्री मंडळाच्या बाहेर असेन.

या वक्तव्यानंतर अनेकांना धक्का बसला मात्र काही वेळातच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि भाजपच्या अध्यक्षांनी ट्विट करत देवेंद्र फडणवी उपमुख्यमंत्री (deputy chief minister) होणार असल्याचे ट्विट केले. जे. पी. नड्ड् आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या या ट्विटमुळे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले.

मी मंत्री मंडळाच्या बाहेर असेन

एकनाथ शिंदे मुंबईत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली. याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मी मंत्री मंडळाच्या बाहेर असेन. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेक जणांना धक्का बसला. मात्र हा धक्का जास्त काळ न राहता भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ट्विट करत त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील जनतेच्या भल्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मोठे मन दाखवत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

 महाराष्ट्रातील जनतेची ओढ

त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनीही मोठ्या मनाने मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळेच त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची किती ओढ आहे हेही दिसून आले असंही त्यांनी ट्विट केले.

 अनेकांना तो धक्का

देवेंद्र फडणवीस यांनी मी मंत्रिमंडळाच्या बाहेर असेन सांगताच अनेकांना तो धक्का होता. मात्र त्यानंतर काही वेळातच भाजपच्या जे. पी. नड्डा आणि अमित शहा यांनी ट्विट करत त्यांना उपमुख्यमंत्री होण्याचा त्यांनी निर्णय घेतला असल्याचे सांगत त्यांचे त्यांनी अभिनंदनही केले. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या या ट्विटमुळे भाजपममधील वाद उफाळून आ्ल्याचे दिसून आले आहे.

 महाराष्ट्रातील राजकारणात आणखी एक ट्विस्ट

अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांच्या ट्विटमुळे आता महाराष्ट्रातील राजकारणात आणखी एक ट्विस्ट पाहायला मिळाले. देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री मंडळात सहभागी होणार नाही असं घोषीत केल्यानंतर चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांचीही नावं चर्चेत आली होती, मात्र आता देवेंद्रफडणवीस यांनी आपण उपमुख्यमंत्री होणार असल्याचे सांगितल्यानंतर ही दोन नावं बाजूला पडली असल्याचे दिसत आहे. पंकजा मुंडे यांच्याही नावाची चर्चा होती मात्र या एका निर्णयामुळे आता मंत्रिमंडळात कोणाकोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.