स्वत: जाऊन मनोज जरांगेंची का भेट घेतली नाही? अखेर फडणवीसांनी मौन सोडलं

'टीव्ही 9 मराठी'चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी 'लोकसभेचा महासंग्राम' या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा नेते मनोज जरांगे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर सविस्तर भूमिका मांडली.

स्वत: जाऊन मनोज जरांगेंची का भेट घेतली नाही? अखेर फडणवीसांनी मौन सोडलं
Follow us
| Updated on: Mar 01, 2024 | 6:40 PM

मुंबई | 1 मार्च 2024 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘लोकसभेचा महासंग्राम’ या कार्यक्रमात विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी फडणवीसांची मुलाखत घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा नेते मनोज जरांगे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर सविस्तर भूमिका मांडली. “मनोज जरांगे यांचं उद्दिष्ट काय होतं? मराठा समाजाला आरक्षण देणं. आम्ही राज्य मागासवर्ग आयोग स्थापन केला. चार लाख घरात जाऊन सर्वेक्षण केलं आणि 10 टक्के आरक्षण दिलं. पण हे असेच दिलं पाहिजे, तसंच दिले पाहिजे याला अर्थ नाही. या गोष्टीचं राजकारण होतंय. जरांगे जेव्हा उपोषण करत होते, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सद्हेतूने त्यांना रिस्पॉन्स दिला. आम्हीही रिस्पॉन्स दिला. पण ते आता जे बोलत आहेत, त्यावरून उद्धव ठाकरेंचा गट बोलत आहे की शरद पवार यांचा. कुणाची वाक्य बोलत होते. याबाबत शंका होती. कुणाची स्क्रिप्ट वाचत होते. आज आम्ही पोलीसमध्ये भरती काढली. त्यात मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे. पण तरीही त्यात वेगवेगळ्या गोष्टी काढल्या जात आहेत. पण यातून मुलांना संभ्रमित केलं जातं. आंदोलन होतं. त्यांच्यावर केसेस होतात”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“जरांगे पूर्वी काय बोलत होते आणि आता काय बोलले हे पाहिलं तर ही वाक्य आहेत जे आमचे विरोधक आहेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाच्या भाषेत बोलत आहेत. त्यामुळे स्क्रिप्ट कुणाची आहे. मागे कोण आहे हे बघावं लागेल. जरांगेंना दोष देण्यात फायदा काय? मागे कोण आहे हे पाहिलं पाहिजे”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.

जरांगेंच्या आंदोलनापासून स्वत:ला अलिप्त ठेवलं का?

“मनोज जरांगे यांच्या आंदोलनापासून स्वत:ला अलिप्त ठेवण्याचं कारण नव्हतं. त्या ठिकाणची भावना होती. ती पाहता मी गेल्यावर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतील असं वाटत होतं. लाठीचार्ज पोलिसांनी केला असला तरी होम डिपार्टमेंट माझ्याकडे येतो. त्यामुळे मी गेलो नाही. हा प्रश्न सोडवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या मी मुख्यमंत्र्यासोबत करत होतो. अंतरवलीतील दगडफेकीत पोलिसांवरह दगडफेक झाली. पोलीसही मराठे होते. महिला पोलीसही जखमी झाल्या”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. “मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असतात. त्यांनीच सर्व गोष्टी हँडल करायचे असतात. आम्ही त्यांना मदत करायची असते. माझा जो पूर्वीचा अनुभव होता, त्याबाबतची मदत मी त्यांना केली आहे. शेवटी अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा असतो. त्यांनी घेतला”, असं फडणवीस म्हणाले.

“शरद पवार तिकडे गेले. विरोधी पक्षाचे नेते होते, त्यांच्यासोबत काय व्यवहार झाला? त्यांना दुसऱ्या रस्त्यांनी पोलिसांना बाहेर काढावं लागलं. प्रामाणिक आंदोलक होते तसे हौसे गौसेही होते. एका माणसामुळे चुकीच्या गोष्टींना सामोरे जावं लागलं असतं. त्यामुळे संयमाने जावं लागतं”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

“ओबीसींचं आंदोलन आम्ही संपवलं. मुख्यमंत्री मराठा सामाजाच्या कार्यक्रमात जाऊ शकतात तर ओबीसींनी काय घोडं मारलंय? त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. सरकार भेदभाव करतंय अशी ओबीसींची भावना होती. ती मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून मी ओबीसींच्या आंदोलनात गेलो”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.