गिरीश महाजन, नाथाभाऊ आणि सरकारी वकील, फडणवीसांकडून पेनड्राईव्ह सादर, षडयंत्रांचा शब्द ना शब्द सभागृहात मांडला

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकिलावर गंभीर आरोप केला आहे. भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्यासाठी विशेष सरकारी वकिलांनी षडयंत्रं रचलं होतं.

गिरीश महाजन, नाथाभाऊ आणि सरकारी वकील, फडणवीसांकडून पेनड्राईव्ह सादर, षडयंत्रांचा शब्द ना शब्द सभागृहात मांडला
गिरीश महाजन, नाथाभाऊ आणि सरकारी वकिल, फडणवीसांकडून पेनड्राईव्ह सादरImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 6:24 PM

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी आज विधानसभेत (vidhansabha) राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकिलावर गंभीर आरोप केला आहे. भाजप आमदार गिरीश महाजन (girish mahajan) यांच्यावर मोक्का लावण्यासाठी विशेष सरकारी वकिलांनी षडयंत्रं रचलं होतं. त्याला आमच्या पक्षातून सत्ताधारी पक्षात आलेल्या एका नेत्यानेही मदत केल्याचा धक्कादायक आणि खळबळजनक आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. हे षडयंत्र कसं रचलं जात होतं, त्याचे व्हिडीओ असलेला एक पेनड्राईव्हच फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला. तसेच प्रत्येक व्हिडीओत कुणाचा काय काय संवाद आहे याची सविस्तर माहिती दिली. या व्हिडीओत कोण कोण संवाद साधत आहे हेही त्यांनी सांगितलं. तसेच सरकारी वकिलाने कट कसा प्लांट करायचा, पुरावे कसे तयार करायचे, जबानी कशी नोंदवायची, साक्षीदाराने साक्ष काय द्यायची याची तयारी केल्याचंही फडणवीस यांनी विस्तृतपणे सभागृहात मांडले.

2021मध्ये गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल केला. 2018मध्ये मराठा शिक्षण मंडळाच्या एका गटात संघर्ष आहे. पाटील गट आणि भोईटे गटात हा संघर्ष आहे. महाजनांचे स्वीय सहाय्यकाने अपहरण केल्याच बनावट केस केली. त्या केसमध्ये महाजनांना मोक्का लागला पाहिजे असं सांगून मोका लावण्याचे कागदपत्रं तयार झाले. कोर्टाने महाजनांना दिलासा दिला. राज्य सरकार काय षडयंत्र करते ते सांगतो. एका कत्तलखान्याची कथा. विरोधकांची कत्तल कशी करायची हे षडयंत्र शिजतंय. विशेष सरकारी वकील प्रवीण पंडीत चव्हाण हे या षडयंत्राचे कर्ते आहेत. आमच्याही काळात आणि तुमच्याही काळात त्यांना केस दिल्या. महेश मोतेवार, रमेश कदम, सुरेश जैन, डिएचएल बँक आदी केसेस त्यांना दिल्या होत्या, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पोलीस आणि मंत्र्यांचा सहभाग

ही कथा मोठी आहे. या कथेचं मटेरियल माझ्याकडे भरपूर आहे. त्यावर 25 वेबसीरीज बनतील इतकं मोठं मटेरियल आहे. त्याचा व्हिडीओ मी दिला आहे. सरकारी वकिलांचं कार्यालय हे विरोधकांविरोधातील षडयंत्र करण्याची जागा आहे. चाकू प्लांट करण्यापासून गळ्याला रक्त लावण्यापासून ते ड्रग्जची रेड कशी करायची? रेड प्लांट कशी करायची? हा असा गुन्हेगारी स्वरुपाचा कट वकील रचत आहे. त्यात पोलीस आणि मंत्रीही आले. हे सर्व कुभांड रचलं गेलं. एफआयआर देखील सरकारी वकिलांनी लिहून दिला. साक्षीदार सरकारी वकिलाने दिले. जबानी कशी नोंदवायची हे शिकवलं. रेड कशी करायची याची व्यवस्था केली. आमचे एक माजी नेते आता ते तुमच्या पक्षात आहे त्यांनी ही व्यवस्था केली. हॉटेल बुक केली. पैसे कसे द्यायचे हे झालं, असं त्यांनी सांगितलं.

सव्वाशे तासाचं रेकॉर्डिंग

ही सर्व कथा हे सरकारी वकील आपल्या तोंडाने सांगतील. प्रत्येक घटनेचा छोटा व्हिडीओही तयार केला. महाविकास आघाडीच्या कारागृहात गेलेल्या नेत्यांबाबतही त्यांनी खुलासा केला आहे. माझ्याकडे सव्वाशे तासाचं रेकॉर्डिंग आहे. आता मी निवडक भाग देतो. यातील काही भाग सभागृहाची इभ्रत घालवणारं आहे ते सांगू शकत नाही, असं त्यांनी सांगितलं.

पहिला व्हिडिओ-

महाजनांसाठी कट कसा शिजतो. आम्हाला पैसा निलेश पुरवायचा. दहशत पसवरतोय असं सांगा. ड्रग्ज देतो असं सांगितलं तर मोक्का लागेल. एका ग्रॅमला एक लाख मिळतात असे सांगायचे म्हणजे महाजनांवर मोक्का लागेल

दुसरा व्हिडिओ-

महाजनांचे नाव घ्यायला तयार आहे का? माफीचा साक्षीदार असेल तर करू. ड्रग्जचं नाव घेतलं तरी आपला मोक्का लागेल. ड्रग्ज सापडलाच पाहिजे असं नाही. फक्त संशय क्रिएट करायचा. म्हणजे आपोआप कारवाई होते.

संबंधित बातम्या:

ताई, माझे आई म्हणत जेव्हा किरीट सोमय्यांनी tv9 मराठीचे प्रश्न टाळले, सोमय्या राऊतांच्या आरोपांना उत्तर टाळतायत?

Sanjay Raut Press Conference LIVE : कितीही ताकद लावा, कितीही बदनामी करा, आमचा केसही वाकडा करु शकणार नाहीत : संजय राऊत

VIDEO: ईडीचं वसुलीचं रॅकेट ते सोमय्यांच्या मुलाला निकॉनची पार्टनरशीप; संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.