Devendra Fadnavis | ‘शिवीगाळ नको’, देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात असं का म्हणाले, नेमकं काय घडलं?

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मोलाच्या सूचना केल्या आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती जपली जावी या उद्देशाने त्यांनी कार्यकर्त्यांना काही अतिशय महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. सोशल मीडियावर अनेकदा विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून विरोधकांवर टीका करताना अर्वाच्य भाषा वापरली जाते. याचबाबत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना महत्त्वाची सूचना केली आहे.

Devendra Fadnavis | 'शिवीगाळ नको', देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात असं का म्हणाले, नेमकं काय घडलं?
devendra fadnavis
Follow us
| Updated on: Aug 29, 2023 | 9:08 PM

मुंबई | 29 ऑगस्ट 2023 : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्ष चांगलाच कामाला लागला आहे. भाजप सरकारने केलेली कामे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचावेत यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय आगामी निवडणुकीत भाजपला सर्वाधिक मतदान व्हावं यासाठी नागरिकांना सरकारच्या कामांबद्दल माहिती दिली जात आहे. भाजपकडून प्रचारासाठी वेगवगळ्या माध्यमांचा वापर केला जातोय. यामध्ये सोशल मीडियाचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे भाजप नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या सोशल मीडिया हाताळणाऱ्या कार्यकर्त्यांना मोलाच्या सूचना आणि आदेश दिले आहेत.

आगामी निवडणुकांसाठी कामाला लागा, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केलं. “सोशल मीडियावर विरोधकांना उत्तर देताना शिवीगाळ करु नका”, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दादरच्या सोशल मीडिया कार्यशाळेत देवेंद्र फडणवीस यांनी हा सल्ला दिला आहे. विरोधकांकडून खोट्या बातम्या पसरवण्याचं काम सुरु असल्याचंदेखील फडणवीस यावेळी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस काय-काय म्हणाले?

  • आगामी निवडणुकांसाठी भाजप कार्यकर्त्यांनी कामाला लागावं.
  • सोशल मीडियावर विरोधकांना उत्तर देताना शिवीगाळ करु नका.
  • विरोधकांकडून खोट्या बातम्या पसरवण्याचं काम सुरु आहे.
  • विरोधक सरकारच्या विरोधात चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
  • खरी माहिती सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी पुढाकार घ्या, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे.
  • सरकारी कामे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घ्या.
  • सरकारी कामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करा.
  • केंद्र सरकारच्या योजनांची लाभार्थ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचवा.

सोशल मडियावर विरोधकांचे वस्त्रकरण करा, वाबनकुळेंचं आवाहन

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. सोशल मडियावर विरोधकांचे वस्त्रकरण करा, अशी सूचना बावनकुळे यांनी सोशल मीडिया कार्यकर्त्यांना केली आहे. राज्यात 1 लाख सोशल मीडिया वॉरियर्स नेमणार असंही वाबनकुळे यांनी म्हटलं आहे. बानकुळे यांच्या या वक्तव्यातून भाजप पक्षाकडून आगामी निवडणुकांसाठी महत्त्वाची रणनीती आखली जात असल्याचे संकेत मिळत आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.