“सध्या तरी निवडणूक न झालेली बरी”; पुण्याच्या पोटनिवडणुकीवर देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे याबाबत केंद्र सरकार सोबत करार केला होता. त्याबाबत रेल्वे मंत्र्यांनी काही सुधारणा सुचवल्या होत्या.
नवी दिल्ली: शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा अजून विस्तार नसल्याचे सांगत, शिंदे गट आणि भाजपमधील काही नेते मंत्रीपदासाठी कोट शिवून तयार असल्याची टीका विरोधीसध्या तरी निवडणूक न झालेली बरी; पुण्याच्या पोटनिवडणुकीवर देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले. पक्षनेते अजित पवार यांनी केली होती. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की, मंत्रिमंडळाचा विस्तार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयानुसार केला जाईल, आणि कोणाला कोट द्यायचा आणि कोणाला द्यायचा नाही याचा विचार एकनाथ शिंदे करत आहेत असा पलटवार करत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना टोला लगावला.
शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळामध्ये कोणत्याही महिलेला मंत्रिपद देण्यात आले नाही. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून त्यामध्ये महिलांना योग्य स्थान देण्यात येईल असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे याबाबत केंद्र सरकार सोबत करार केला होता. त्याबाबत रेल्वे मंत्र्यांनी काही सुधारणा सुचवल्या होत्या.
आणि त्यामुळेच या बैठकीला रेल्वे प्रशासनाचेही अधिकारी उपस्थित होते. त्याबाबत सुधारणाही त्यांच्यासमोर ठेवण्यात आल्या आहेत.
त्याला आता तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. तर यंदाच्या बजेमध्येही त्यासाठी 13 हजार कोटी महाराष्ट्राला दिले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.
पुणे निवडणुकीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीबाबत मी स्वतःही काही नेत्यांबरोबर बोललो आहे. त्याबरोबरच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही विनंती केली आहे.
त्यामुळे सध्या तरी निवडणूक न झालेली बरी कारण आता वर्ष बाकी आहे. त्यामुळे अजित पवार यांनीही त्याबाबत विचार करावा असंही त्यांनी यावेळी सांगितले
जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलल्यानंतर आता भाजपने त्यांच्याविरोधात जोरदार आवाज उठविला आहे.
तर त्यांच्या वक्तव्याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, जितेंद्र आव्हाड ज्यावेळी वक्तव्य करतात, लांगुनचालन करण्यासाठी ते काही वेळा सीमा ओलांडतात.
त्यातच काल जितेंद्र आव्हाड यांनी काल बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे महत्व कमी करणे ही अत्यंत वाईट गोष्ट आहे असं म्हणत त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.