2019 ला राष्ट्रपती राजवट लागली तेव्हा नेमकं काय घडलं?; पत्र कुणी लिहिलं? फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

Devendra Fadnavis on Sharad Pawar : 2019 ला राष्ट्रपती राजवट लागली तेव्हा नेमकं काय घडलं? पत्र कुणी लिहिलं?, याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार यांचं नाव घेत देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं? वाचा सविस्तर...

2019 ला राष्ट्रपती राजवट लागली तेव्हा नेमकं काय घडलं?; पत्र कुणी लिहिलं? फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट
शरद पवार, देवेंद्र फडणवीसImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 10:36 AM

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. ही राष्ट्रपती राजवट नेमकी कुणाच्या सांगण्यावरून लागली? याबाबत प्रचंड चर्चा होत आहे. राज्यात जी राष्ट्रपती राजवटी लागू झाली ती शरद पवार यांच्या पत्रामुळे लागू झाली, असं देवेंद्र फडणवीस यांनी एकेठिकाणी बोलताना म्हटलं. त्यानंतर tv9 मराठीच्या मुलाखतीत शरद पवार यांनी मोजक्या शब्दात देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर टिपण्णी केली. त्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. tv9 मराठीवर झालेल्या मुलाखतीत फडणवीसांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार काय म्हणाले होते?

मी फडणवीस यांचा आभारी आहे. मी सत्तेत नव्हतो. माझ्याकडे काही संस्थेचं सदस्यत्व नाही की, मी सांगितल्यावर राष्ट्रपती राजवट लागते. तरी मी सांगितल्यावर राष्ट्रपती राजवट लागते. याचा अर्थ त्यांनी ओळखलं पाहिजे की, राजकारणात माझं स्थान काय आहे, असं म्हणत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर प्रतिवार केला होता. त्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

आमची जी एकत्र बैठक झाली ती शरद पवार यांनी मान्य केली. या बैठकीत असं ठरलं की थोडा वेळ घालवायचा. म्हणजे मग राष्ट्रपती राजवट लावता येते. राज्यपाल प्रत्येक पक्षाला विचारतात की तुम्हाला सरकार स्थापन करायचं आहे का? सगळ्यांनी नकार दिला तरच मग त्यांना राष्ट्रपती राजवट लावता येते. पवारसाहेबांनीच आम्हाला सांगितलं की तुम्ही नाही म्हटलं तर शिवसेना एकटी सरकार स्थापन करू शकणार नाही. आम्ही नाही म्हटलं तर काँग्रेस सरकार स्थापन करू शकणार नाही. तेव्हा मी महाराष्ट्राचं मत आहे की आपल्याला स्थिर सरकार हवं आहे. म्हणून मग आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मग आपण सरकार स्थापन करू, असं फडणवीसांनी सांगितलं.

राज्यपालांनी जेव्हा राष्ट्रवादीला सरकार स्थापन करण्यासाठी पत्राद्वारे विचारलं. तेव्हा त्याचं उत्तर माझ्या म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर ड्राफ्ट झालं. मग ते पत्र अजित पवारांनी शरद पवारांकडे पाठवलं. त्यावेळी शरद पवार हे लीलावती रूग्णालयात संजय राऊतांना भेटायला गेले होते. मग पवारसाहेबांनी सांगितलं की दोन मुद्दे काढा आणि आणखी दोन मुद्दे त्यात अॅड करा. त्या हिशोबाने पुन्हा पत्र ड्राफ्ट झालं. त्यावर अजित पवारांनी सही केली आणि ते पत्र राज्यपालांकडे पाठवण्यात आलं. मग तीनही पक्षांनी सरकार स्थापन करण्यास नकार दिला. मग तिसऱ्या पक्षाने म्हटलं की आम्ही सरकार स्थापन करू तरी ते शक्य नव्हतं. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागली, असं फडणवीस म्हणाले.

Non Stop LIVE Update
चित्रा वाघ यांचं ट्वीट खरं की खोटं? नितीन राऊतांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर
चित्रा वाघ यांचं ट्वीट खरं की खोटं? नितीन राऊतांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर.
मनसेनं 'खुर्ची' टाकली, संजय राऊत 'खाट' टाकणार, राज ठाकरेंवर निशाणा
मनसेनं 'खुर्ची' टाकली, संजय राऊत 'खाट' टाकणार, राज ठाकरेंवर निशाणा.
पवारांच्या पत्नीला कंपनीत रोखलं, अर्धा तास खोळंबा अन्... काय घडलं?
पवारांच्या पत्नीला कंपनीत रोखलं, अर्धा तास खोळंबा अन्... काय घडलं?.
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.