मुंबई: भांडूपच्या ड्रिम मॉलमध्ये सनराईज रुग्णालयामध्ये लागलेल्या आगीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संशय व्यक्त केला आहे. या आगीबाबत अनेक संभ्रम आहेत. ही आग नेमकी कुठे लागली? कशी लागली? तिचा पीएमसी बँकेशी संबंध काय? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. फडणवीस यांनी थेट पीएमसी बँकेशी या आगीचा संबंध जोडल्याने अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. (devendra fadnavis raised questions on bhandup mall fire)
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज भांडूपच्या ड्रिम मॉलमध्ये लागलेल्या आगीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी हा संशय व्यक्त केला. झालेली घटना अत्यंत गंभीर आहे. हे कोव्हिड रुग्णालय या ठिकाणी तात्पुरतं सुरु झालं, या मॉलला ओसी नव्हती, मुख्यमंत्री म्हणाले. मात्र, भंडाऱ्याची घटना झाल्यानंतर सर्व रुग्णालयांची फायर ऑडिट करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. जी तात्पुरती रुग्णालये आहेत, त्यांचं ऑडिट करणं आवश्यक होतं, ते झालं नाही. सरकार केवळ घोषणा करतं, अशी टीका फडणवीस यांनी केली.
पालिकेचा ढिसाळपणा
या मॉलमध्ये आग लागल्यानंतर रेस्क्यूसाठी जागा नव्हती. आगीबाबत अनेक संभ्रमाच्या गोष्टी आहेत. आग नेमकी कुठे लागली?, कशी लागली?, पीएमसी बँकेशी संबंध आहे?, काही दुकानदार सांगतात, आमची केस होती म्हणून आग लागली. अशा अनेक गोष्टी आहेत. ठिक आहे, या सर्व कथांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही. त्याचं विश्लेषण करावं लागेल. जी घटना घडली आहे, त्यामध्ये बीएमसीचं दुर्लक्ष आणि ढिसाळपणा स्पष्ट दिसतोय, असं ते म्हणाले.
दोषींवर कारवाई करा
अशा घटनांच्या माध्यमातून आपण अजून किती मृत्यू होण्याची वाट बघत आहोत. उद्या अशी घटना इतर सेंटर्समध्ये झाली तर कोण जबाबदार?, अशा घटना होऊ नयेत यासाठी खबरदारी होणं आवश्यक आहे. चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी. फायर सेफ्टी ऑडिट झालं नसेल तर जबाबदार लोकांवर कारवाई करा, अशी मागणीही त्यांनी केली.
तो अहवाल चुकीचा
यावेळी त्यांनी मुख्यसचिव सीताराम कुंटे यांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याबाबत तयार केलेल्या अहवालावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. कुंटे यांना मी गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो. ते साधे आणि सरळमार्गी अधिकारी आहे. त्यांनी हा रिपोर्ट तयार केलाच नाही. जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांनी हा अहवाल तयार केला असेल आणि त्यावर कुंटे यांनी सही केली असेल. असाच हा अहवाल आहे. तसे नसते तर या अहवालत प्रचंड चुकी आढळल्याच नसत्या, असंही ते म्हणाले. या अहवालात अनेक चुका आहेत. जेव्हा राष्ट्रीय सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित होतो, असं म्हटलं आहे. परंतु या अहवालात फोन टॅपिंगचं आणखी एक कारण दडवून ठेवलं आहे. एखादा गुन्हा घडणार असेल किंवा मोठा भ्रष्टाचार होणार असेल तरीही फोन टॅपिंग केली जाते, हे या अहवालत नमूद करण्यात आलेलंच नाही, असं फडणवीस म्हणाले. (devendra fadnavis raised questions on bhandup mall fire)
VIDEO : SuperFast 100 News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 26 March 2021https://t.co/pgKeMxpqC5
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 26, 2021
संबंधित बातम्या:
(devendra fadnavis raised questions on bhandup mall fire)