अनिल देशमुख 15 फेब्रुवारी रोजी काय करत होते?; फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट

गृहमंत्री अनिल देशमुख 15 फेब्रुवारी रोजी होम क्वॉरंटाईन नव्हते. (devendra fadnavis reaction on parambir singh letter)

अनिल देशमुख 15 फेब्रुवारी रोजी काय करत होते?; फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेता
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 12:14 PM

मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख 15 फेब्रुवारी रोजी होम क्वॉरंटाईन नव्हते. ते एका खासगी विमानाने मुंबईत आले होते. त्या दिवशी ते अनेकांना भेटले होते, असा दावा करतानाच शरद पवार यांना चुकीची माहिती देण्यात आली असून आता देशमुख एक्सपोज झाले आहेत, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. (devendra fadnavis reaction on parambir singh letter)

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून पवारांचे दाव्यांची पोलखोल केली होती. त्यामुळे फडणवीस आज काय मोठा गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आपण नेहमी मराठीत आणि हिंदीत बोलतो. पण पवारांनी हा विषय राष्ट्रीय केला आहे. त्यामुळे मी हिंदीत सुरुवातीला बोलेल त्यानंतर मराठीत बोलेले. पवारां इतकं माझं इंग्रजी चांगलं नाही. त्यामुळे मी हिंदीत बोलतो, अशी सुरुवात करत फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेचा रोख काय असणार आहे हे स्पष्ट केलं.

पोलिसांच्या दैनंदिन कार्यक्रमानुसार देशमुख मुंबईत

15 तारखेचा गृहमंत्र्यांची ही कार्यक्रम पत्रिका आहे. 15 तारखेला ते एका खासगी विमानाने आले होते. 15 तारखेला ते आपल्या घरी होते. पण पोलीस विभागाच्या दैनंदिन कामाचा माझ्याकडे एक कागद आहे. त्यात 17 फेब्रुवारीची एक तारीख आहे. त्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतला राहतील. तर अनिल देशमुख हे दुपारी 3 वाजता सह्याद्रीला येतील. त्यानंतर 24 तारखेला पुन्हा अनिल देशमुख हे 11 वाजता मोटारीने निवासस्थानी जाणार असल्याचं पोलिसांची माहिती आहे. अर्थात त्या कार्यक्रमानुसार ते गेले असतीलच असा माझा दावा नाही, असं फडणवीस म्हणाले.

15 तारखेला देशमुख आयसोलेट नव्हते

काल पवारांना योग्य ब्रिफिंग दिली जात नव्हते. पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्याच्या तोंडून चुकीची माहिती दिली गेली. देशमुखांना प्रोटेक्ट केलं गेलं. त्यामुळे ते एक्सपोज झाले होते. 15 तारखेला देशमुख आयसोलेट नव्हते. त्या दिवशी त्यांना अनेक लोक भेटले होते, असा दावाही त्यांनी केला.

बदल्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश

यावेळी फडणवीसांनी राज्यातील पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. परमबीर सिंग हे तक्रार करणारे पहिले व्यक्ती नाहीत. डीजींनी यापूर्वी एक रिपोर्ट दिला आहे. यापूर्वी तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी एक रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देण्यात आला होता. हा 6.3 जीबीचा डेटा आहे. त्या सर्व कॉल रेकॉर्ड आहे. मी मुख्यमंत्री असताना 2017 एका हॉटेलमध्ये काही डिलिंग सुरू असल्याचं कळलं होतं. तिथे काही पोलीस जात असल्याचं कळलं होतं. त्यामुळे पोलिसांनी तिथे धाड टाकली आणि सात ते आठ जणांना अटक केली. त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले. चार्जशीटही केलं. त्याच सीओआय आता आहेत. त्यांच्या हे लक्षात आल्याने त्यांनी डीजीची परवानगी घेतली आणि काही लोकांचे नंबर इंटरसेप्शनवर लावले. त्यात काही पोलीस अधिकारी आणि राजकीय नेत्यांचे अनेक विस्फोटक संवाद समोर येऊ लागले. हे पाहिल्यानंतर त्यातनं खूप मोठं रॅकेट झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्याच्याशी गृहमंत्रालयाच्या लोकांचे संबंध दिसत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे सीओआय म्हणजे कमिशनर ऑफ इंटेलिजन्सने या प्रकरणाचा एक रिपोर्ट तयार केला. त्यांनी हा रिपोर्ट पोलीस महासंचालकांना दिला आणि नंतर तो मुख्यमंत्र्यांकडे गेला. 8 ऑगस्ट 2020मध्ये हा अहवाल देण्यात आला. या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी हे सर्व ऐकून घेतलं, मात्र त्यावर काहीच कारवाई केली नाही, असं फडणवीस म्हणाले.

गृहसचिवांना भेटणार

आज या प्रकरणाचा सर्व डेटा मी गृहसचिवांना देणार आहे. त्यांच्याकडे सर्व पुरावे देणार असून या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी करणार आहे. त्यासाठी मी आज दिल्लीला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. (devendra fadnavis reaction on parambir singh letter)

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या ‘त्या’ अहवालाची सीबीआय चौकशी करा; फडणवीस आज केंद्रीय गृहसचिवांना भेटणार

मला पवारांसारखं इंग्रजी येत नाही, टोला लगावत देवेंद्र फडणवीसांनी ‘ती’ प्रथा मोडली

ठाकरे सरकारवर देवेंद्र फडणवीसांचा डेटाबॉम्ब; पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश

(devendra fadnavis reaction on parambir singh letter)

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....