सैफ अली खानवरील हल्ल्याच्या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळले आहेत. तसेच त्यांनी या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असल्याचे सांगितले. दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी या घटनेवरून सरकारवर निशाणा साधला आहे, तर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

सैफ अली खानवरील हल्ल्याच्या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या घटनेवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Jan 16, 2025 | 4:57 PM

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हल्ल्याबाबत पोलिसांनी माहिती दिली असून तपास सुरु आहे, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुंबई असुरक्षित आहे, असं म्हणणं योग्य नाही, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच विरोधकांनी लावलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. “पोलिसांनी या घटनेबाबतची सर्व माहिती दिली आहे. या पाठीमागे कशाप्रकारचा मोटीव असू शकतो, हे देखील त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. आरोपी कुठून आला हे देखील पोलिसांनी सांगितलं आहे. आता पूर्ण कारवाई सुरु आहे”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

“मला असं वाटतं की देशातील मेगासिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे. हे खरं आहे की, कधीकधी काही घटना घडतात. त्याला गंभीरतेने देखील घेतलं पाहिजे. पण केवळ त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे, असं म्हणणं योग्य होणार नाही. याने मुंबईची प्रतिमा देखील खराब होते. पण मुंबई अधिक सुरक्षित राहायला पाहिजे या दृष्टीने सरकार नक्की प्रयत्न करेल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आदित्य ठाकरे यांचा सरकारवर घणाघात

आमदार आदित्य ठाकरे यांनी या घटनेवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “सैफ अली खान यांच्या घरात झालेली घुसखोरी आणि त्यांच्यावर झालेला चाकू हल्ला हे धक्कादायक आहे. त्यांची प्रकृती ठीक आणि बरी आहे. हे ऐकून दिलासा मिळाला आहे आणि कठीण काळ संपवून ते लवकरात लवकर सामान्य स्थितीत परत यावे, अशी आम्ही प्रार्थना करतोय. पण हे घडले, ही वस्तुस्थिती महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडवून देतेय”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“गेल्या 3 वर्षांत हिट अँड रन प्रकरण, अभिनेते आणि राजकारण्यांना धमक्या देणे, बीड आणि परभणीमधील घटनांसारख्या घटनांवरून हेच ​​दिसून येते की, सरकार गुन्हेगारी रोखण्यात आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. आपल्या सरकारमध्ये नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेणारा कोणी आहे का?”, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केलाय.

प्रवीण दरेकर यांचंदेखील प्रत्युत्तर

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. “सैफ अली खान प्रकरणात पोलीस तपास करत आहेत. लवकरच सत्य बाहेर येईल. परंतु लगेच शरद पवार किंवा संजय राऊत यांना राजकीय आखड्यात उतरण्याची गरज नाही. प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे नसते याचे भान कदाचित संजय राऊत यांना नसेल. परंतु पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला असायला हवे”, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.