VIDEO : फडणवीस यांनी केंद्रात नेतृत्व करावं; संजय शिरसाट यांचं खळबळजनक विधान

तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या पाया पडला. शिवसेनेचा कार्यक्रम असतो तेव्हा आम्ही सर्वांचे फोटो लावतो. आम्ही तुमच्यासारखे दलाल नाहीत, अशी टीका संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

VIDEO : फडणवीस यांनी केंद्रात नेतृत्व करावं; संजय शिरसाट यांचं खळबळजनक विधान
sanjay shirsathImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 07, 2023 | 3:47 PM

गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 7 ऑक्टोबर 2023 : अजितदादा गटाचे नेते छगन भुजबळ, नरहरी झिरवळ आणि धर्मरावबाबा यांनी अजित पवार हे पुढचे मुख्यमंत्री झाले पाहिजे, असं सूतोवाच केलं आहे. त्यामुळे अजितदादा मुख्यमंत्री होणार का? अशी चर्चा रंगली आहे. ही चर्चा सुरू असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्री व्हावे ही कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही मोठं विधान केलं आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मुख्यमंत्रीपदाबाबतची काही लोकं बॅनर लावतात. यावर अजितदादांनी स्पष्ट केलं. देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्ट केलं. मीही सांगतो की, ते बॅनर लावतात त्यात काही गैर नाही. जे बॅनर लावतात त्यांना शुभेच्छा आहे. पण माझीही इच्छा आहे की, एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहावेत. आणि देवेंद्र फडणवीस इतकं चांगलं काम करत आहेत. त्यांनी केंद्रात नेतृत्व करावं. कॅपेसिटीचा जो भाग आहे ना तो फडणवीस यांच्याकडे आहे. म्हणून आम्हालाही वाटतं त्यांनी तेही नेतृत्व केलं पाहिजे, असा सल्ला संजय शिरसाट यांनी दिला आहे.

घणाघाती नाही, घाण टीका

संजय राऊत यांनी या सरकारचा नाडा दिल्लीच्या हाती असल्याचं म्हटलं होतं. त्यावरही त्यांनी टीका केली. राऊत यांच्या या विधानावरून शिरसाट यांनी त्यांना शिवीगाळ केली. संजय राऊत यांनी घणाघाती नाही तर घाण टीका केली. खाली वाकून पाहण्याची त्याची सवय आहे. तुम्ही चोर आहात. तुमच्यावर कारवाई होणार म्हणून टीका करत आहात. मुख्यमंत्र्यांवर इतक्या खालच्या पातळीवर टीका करणारे आम्ही पाहिलेच नाही. राऊत यांनी नशिब फक्त नाडी आणि बेल्ट पाहिला. त्याखाली काय आहे ते पाहिले नाही. नाहीतर नॅशनल टीव्हीवर ते ही सांगतील, अशी टीका त्यांनी केली.

सडेतोड उत्तर मिळेल

संजय राऊत ही राज्याला लागलेली किड आहे. जर तो आमच्या साहेबांना अशा भाषेत बोलत असेल तर त्याचा आम्हीही ऊद्धार केल्याशिवाय राहणार नाही. सडेतोड उत्तर मिळेल, असा इशारा संजय शिरसाट यांनी दिला.

न घर का ना घाट का

देवेंद्र फडणवीस डमरू वाजवतात. तुम्ही काय करता? संजय राऊत तुम्ही धोबी का कुत्ता, न घर का ना घाट का आहात. एकनाथ शिंदे फकीर आहेत. त्यांना लालूच नाही. राज्यसभेची उमेदवारी मागताना मला वाचवा असं ते एकनाथ शिंदे यांना म्हणाला होतात, अशी आठवणही त्यांनी करून दिली.

Non Stop LIVE Update
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....