ठाकरे सरकारचा अहंकार दुर्योधनाच्या अहंकारासारखाच; फडणवीसांचा घणाघाती हल्ला

शिवसेना नेते संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी महाभारताचा उल्लेख करून भाजपला कौरवाची उपमा दिली होती. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला कौरवाची उपमा दिली आहे. (Devendra Fadnavis)

ठाकरे सरकारचा अहंकार दुर्योधनाच्या अहंकारासारखाच; फडणवीसांचा घणाघाती हल्ला
Devendra Fadnavis
Follow us
| Updated on: Jul 06, 2021 | 4:25 PM

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी महाभारताचा उल्लेख करून भाजपला कौरवाची उपमा दिली होती. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला कौरवाची उपमा दिली आहे. ठाकरे सरकारचा अहंकार दुर्योधनाच्या अहंकारासारखाच आहे, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. (Devendra Fadnavis slams maha vikas aghadi over 12 MLAs suspension)

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या प्रांगणात मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. पांडवांनी कौरवांना केवळ सात गावं मागितली होती. पण सुईच्या टोका एवढीही जागा देणार नाही, असं दुर्योधन म्हणाला होता. याचा अर्थ काय होतो, दुर्योधनाचा अहंकार शिगेला पोहोचला होता. दुर्योधनाच्या अहंकारासारखाच ठाकरे सरकारचा अहंकारही शिगेला पोहोचला आहे. डोक्यात अहंकार घेऊन आलेले हे सरकार आहे. त्यामुळे दुर्योधन कोण? दुशासन कोण? आणि भीष्म पितामह कोण? हे तुम्हीच ठरवा, असं फडणवीस म्हणाले.

सत्ता डोक्यात जाते तेव्हा…

सत्ता डोक्यात जाते तेव्हा विरोधी पक्षाची गरज राहत नाही. मी मुख्यमंत्री असताना असे तणावाचे प्रसंग आले. त्यावेळी मी स्वत: जाऊन चर्चा करायचो. समोरच्या व्यक्तीचं म्हणणं समजून घ्यायचो. आता कोणीही चर्चा करण्यासाठी आलं नाही. कारण डोक्यात सत्ता गेली आहे. सत्ता डोक्यात गेलेले असे लोक अधिक काळ टिकत नाही, असं ते म्हणाले.

पाच तास प्रतिविधानसभा

दरम्यान, 12 आमदारांच्या निलंबन कारवाईच्या निषेधार्थ विरोधकांनी विधानसभेबाहेरच प्रतिविधानसभा भरवली. ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली पाच तास ही प्रतिविधानसभा चालली. आम्ही या प्रतिविधानसभेतून सरकारचा बुरखा फाडला आहे. सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले आहे. शेतकरी, विद्यार्थी, मराठा तरुण, ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

कृषी कायदे फेटाळले नाहीत याचं समाधान

यावेळी त्यांनी कृषी कायद्याबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्य सरकारने तीन कायदे सभागृहात मांडले. त्यांनी कृषी कायदे फेटाळले नाहीत हे चांगलं झालं. कृषी कायद्यात त्यांनी काही सूचना सूचवल्या आहेत. हे अपेक्षितच होते. त्यातील दोन कायदे महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत, असं त्यांनी सांगितलं. (Devendra Fadnavis slams maha vikas aghadi over 12 MLAs suspension)

संबंधित बातम्या:

12 आमदारांच्या निलंबनाविरोधात कोर्टात जाणार: चंद्रकांत पाटील

फोन टॅपिंग प्रकरण भाजपला भोवणार?; उच्चस्तरीय चौकशीचे गृहमंत्र्यांचे आदेश

विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता

(Devendra Fadnavis slams maha vikas aghadi over 12 MLAs suspension)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.