Rajya Sabha Election Results 2022 : का देवेंद्रच महाराष्ट्रात ‘नरेंद्र’ आहेत? विजयी झाल्यानंतर फडणवीस जे जगताप, टिळकांबद्दल बोलले ती खरीखुरी इमोशनल श्टोरी

भाजपच्या पुण्यातील आमदार मुक्ता टिळक यांनाही खास ॲम्बुलन्समधून मुंबईत आणण्यात आले होते. स्ट्रेचरवरूनच त्या विधानभवनात पोहोचल्या आणि त्यांनी मतदान केले. तर आमदार लक्ष्मण जगताप यांनाही अॅम्ब्युलन्समधून आणण्यात आले होते.

Rajya Sabha Election Results 2022 : का देवेंद्रच महाराष्ट्रात 'नरेंद्र' आहेत? विजयी झाल्यानंतर फडणवीस जे जगताप, टिळकांबद्दल बोलले ती खरीखुरी इमोशनल श्टोरी
विजयानंतर भाजपा नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीसImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 10:40 AM

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत झालेला विजय हा आमचे लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप आणि दुसऱ्या लढवय्या आमदार मुक्ता टिळक यांना समर्पित करतो, अशी प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. भाजपाचे तीनही उमेदवार निवडून आले आहेत, हा आनंदाचा क्षण असल्याचेही ते विजयानंतर म्हणाले. यावेळी त्यांनी लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांचे विशेष आभार मानले. ते म्हणाले, की लक्ष्मणभाऊ (Laxman Jagtap) अॅम्ब्युलन्सने मुंबईत दाखल झाले आणि त्यांनी मतदान केले. आमच्यासाठी लक्ष्मणभाऊ महत्त्वाचे आहेत. एखादी सीट आली काय नाही आली काय, भविष्यात परत जिंकू. मात्र लक्ष्मणभाऊंचा जीव महत्त्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. कर्करोगाशी झुंज देणाऱ्या मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचेही त्यांनी आभार मानले.

‘माझ्या पक्षासाठी मी येणारच’

पुढे ते म्हणाले, की पण लक्ष्मणभाऊंनी सांगितले, की काहीही झाले तरी माझ्या पक्षासाठी मी येणारच. ते आले मी त्यांचा आभारी आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुक्त टिळक यांचेही मनापासून आभार त्यांनी मानले. मुक्त टिळक या अत्यंत विपरित परिस्थितीत मुंबईत मतदानासाठी आल्या, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे फडणवीस म्हणाले. काल भाजपच्या पुण्यातील आमदार मुक्ता टिळक यांनाही खास ॲम्बुलन्समधून मुंबईत आणण्यात आले होते. स्ट्रेचरवरूनच त्या विधानभवनात पोहोचल्या आणि त्यांनी मतदान केले. तर आमदार लक्ष्मण जगताप यांनाही अॅम्ब्युलन्समधून आणण्यात आले होते. त्यांनीही आपल्या मतांचा हक्क बजावला आहे.

लक्ष्मण जगताप अॅम्ब्युलन्समधून विधानभवनात!

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातील नरेंद्र!

भाजपाला बहुमत दिले होते. मात्र आमच्या पाठीत सुरा खुपसून ते काढून घेण्यात आले. अशाप्रकारचे सरकार हे किती अंतर्विरोधाने भरले जाते, हे आजच्या विजयानंतर पाहायला मिळाले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. अपक्षांना आपलेले करण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले. त्यामुळेच महाविकास आघाडीची मते फुटली आणि भाजपाचा विजय झाला. त्यांनी केलेली खेळी यशस्वी झाली आणि भाजपाचा विजय झाला.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

दोघेही गंभीर आजारी

भाजपाच्या कसब पेठ मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक या गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहेत. त्यांना कर्करोग झाला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गंभीर आजारी असल्या तरी राज्यसभेसाठी एक एक मत महत्त्वाचे असल्याने पक्षादेश पाळून त्या मुंबईत मतदानासाठी आल्या होत्या. तर चिंचवडचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप हेदेखील काल आजारी असताना रुग्णालयातून थेट मुंबईत मतदानासाठी अॅम्ब्युलन्समधून आले होते.

मुक्ता टिळक अॅम्ब्युलन्समधून मुंबईत

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.