ऐतिहासिक बहुमताचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांचा तिसऱ्यांदा राज्याभिषेक होणार

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता मुख्यमंत्रीपदाची लवकरच शपथ घेणार आहेत. येत्या २-३ दिवसात त्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते. त्यानंतर ५ तारखेला त्यांचा शपथविधी होऊ शकतो. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला स्थान मिळेल याबाबत उत्सूकता आहे.

ऐतिहासिक बहुमताचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांचा तिसऱ्यांदा राज्याभिषेक होणार
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 1:12 AM

मुख्यमंत्री कोण हे निकालानंतर ठरवू असं महायुतीचे तिन्ही नेते म्हणत होते. त्यानुसार दिल्लीत अमित शाहांच्या उपस्थितीत बैठक झाली. आणि देवेंद्र फडणवीसांच्याच नावावर अंतिम शिक्कामोर्तब झालं. आता फक्त आमदारांच्या बैठकीत नेता निवड होऊन, औपचारिकता पूर्ण होईल. छप्पर फाडूनच भाजप महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आणि आता या ऐतिहासिक बहुमताचे शिल्पकार देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार आहेत.

दिल्लीत अमित शाहांसोबतच्या महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत फडणवीसांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालं, हे सांगण्यासाठी हा फोटो फार बोलका आहे. अमित शाहांना बुके देताना फडणवीसांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे तर शिंदेंच्या चेहऱ्यावर कुठलेही हावभाव नाहीत. आता केंद्रातील निरीक्षकांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत फडणवीसांची नेता निवड करुन, औपचारिक मोहोर उमटवण्यात येईल.

शिवसेनेकडून किमान 2 वर्षे तरी मुख्यमंत्रिपद मिळावं म्हणून प्रयत्न झाले. पण 132 आमदारांच्या तगड्या संख्याबळापुढं शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर टिकली नाही. त्यामुळं पूर्ण 5 वर्ष फडणवीसांच्याच नेतृत्वात महायुतीचं सरकार असेल.

लोकसभेच्या निकालात महायुती विषेशत: भाजपला जबर फटका बसला. 23 खासदारांवरुन भाजप 9 वर आली. त्यातच उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना नाव घेवून तू राहशील किंवा मी राहील म्हणत खुलं आव्हान दिलं. मात्र देवेंद्र फडणवीसांनी असं काही बाऊंस बॅक केलं की महायुती 230 वर आणि महाविकास आघाडी 49वर आली.

प्रचारात उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमधली शाब्दिक लढाई चक्रव्युहापर्यंत आली होती. पण आपण आधुनिक अभिमन्यू असल्याचं सांगत फडणवीसांनी 132 आमदार आणून ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. भाजपनं 149 जागांवर उमेदवार दिले…त्यापैकी 132 जागा जिंकल्या…तब्बल 88.59% स्ट्राईक रेट भाजपचा राहिलाय. तर फडणवीसांना चक्रव्युहात अडवण्याची भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना स्ट्राईक रेट फक्त 20.83 % आहे. ठाकरेंनी 96 जागांपैकी फक्त 20 जागा जिंकल्या.

महाराष्ट्रात प्रचार बटेंगे तो कटेंगेपासून एक है तो सेफ है आणि धर्मयुद्धापर्यंत आला. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या सज्जाद नोमानींनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि पटोलेंसाठी व्होट जिहादचं उघड आवाहन केल्यानंतर, फडणवीसांनी धर्मयुद्धाची घोषणा केली.

फडणवीसांच्या भाषेत सांगायचं झालं, तर व्होट जिहादच्या विरोधातला सामना ते जिंकलेत आणि आता फडणवीसच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाल्यानंतर काँग्रेसचे विजय वडेट्टीवारांनाही, विदर्भातला मुख्यमंत्री होत असल्यानं आनंद झालाय .तर संजय राऊतांनीही फडणवीसांचं स्वागत केलंय.

2014 ते 2019 पर्यंत पूर्ण 5 वर्षे…आणि 2019 मध्ये 72 तासांसाठी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर आता, तिसऱ्यांदा फडणवीसांचा राज्याभिषेक होणार आहे.

'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'.
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले.
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!.
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल.
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती.
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?.
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?.
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?.
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?.
मतांचा टक्का वाढला, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?
मतांचा टक्का वाढला, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?.