औरंगाबादमध्ये उद्योजकांवरील हल्ले गंभीर, फास्ट ट्रॅक कोर्टात खटले चालवा; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्रं
औरंगाबादमध्ये उद्योजकांवर होणाऱ्या हल्ल्यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहून चिंता व्यक्त केली आहे. (devendra fadnavis wrote cm uddhav thackeray over Attack on businessman in aurangabad)
मुंबई: औरंगाबादमध्ये उद्योजकांवर होणाऱ्या हल्ल्यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहून चिंता व्यक्त केली आहे. तसेच उद्योजकांवर हल्ले करणाऱ्यांवर जलदगती न्यायालयात खटले भरून आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. (devendra fadnavis wrote cm uddhav thackeray over Attack on businessman in aurangabad)
औरंगाबादमध्ये सातत्याने उद्योजकांवर होत असलेले हल्ले, त्यातून महाराष्ट्राबाहेर जाणारे विपरित चित्र, यामुळे रोजगारांवर येणारी गदा, इत्यादींचा गांभीर्याने विचार करून याबाबत तातडीने पाऊले उचलण्यात यावीत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच उद्योजकांवर कधी कधी आणि कसे हल्ले झाले याकडेही त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
हल्ल्यांचा पाढा वाचला
8 ऑगस्ट रोजी भोगले उद्योग समूहाचे प्रबंध संचालक नित्यानंद भोगले, उत्पादन व्यवस्थापक श्री सोनगीरकर, कार्मिक व्यवस्थापक भूषण व्याहाळकर या तिघांना बाहेरून आलेल्या 15-20 कथित गुंडांनी मारहाण केली. यासंदर्भातील संपूर्ण फुटेज पोलिसांकडे उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची चिथावणी नसताना ही मारहाण झाली आहे. या प्रकरणातील काही आरोपींना अटक झाली तर काही फरार आहेत. 10 ऑगस्ट रोजी वाळुज एमआयडीसी परिसरात असलेल्या श्री गणेश कोटिंग समूहावर हल्ला करण्यात आला. लेबर कॉन्ट्रॅक्ट आम्हाला द्या, या मागणीसाठी हे लोक गेले होते. या दोन घटनांनंतर आता इतरही अनेक छोट्या उद्योगांच्या समस्या पुढे येत आहेत. पेट्रोल भरून पेट्रोलचे पैसे न देणे, हॉटेलमध्ये जेवल्यावर त्याचे पैसे न देणे, वाहनांची दुरूस्ती केल्यावर त्याचे पैसे न देणे, अशा अनेक तक्रारी पुढे येत आहेत. विशेषत: अलिकडच्या 8-10 महिन्यात अशा तक्रारी वाढल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अशा प्रकरणात पोलिसांत तक्रारी झाल्यानंतर सामान्य कलमांन्वये कारवाई होते. परिणामी वर्षोनुवर्षे न्यायालयात तक्रारी प्रलंबित राहतात आणि कितीतरी वर्षांनी शिक्षा सुनावली जाते, असं त्यांनी म्हटलं आहे.
स्वत: लक्ष घालून कारवाई करा
जिल्ह्यात या घटना सातत्याने घडत राहिल्यास त्याचा राज्यात गुंतवणूक येण्याच्या प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम होतो. शिवाय एक वेगळे चित्र गुंतवणूकदारांच्या मनात उभे राहते. त्यामुळे महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक यावी, यातून मोठ्या संख्येने रोजगारनिर्मिती व्हावी, यासाठी अशा घटनांकडे अतिशय गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. या सर्व घटनांमध्ये कठोरातील कठोर कलमे लावून, हे खटले जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा होत नाही, तोवर या कथित गुंडांवर जरब बसणार नाही. आपण स्वत: यात लक्ष घालून तातडीने कारवाई कराल, ही आशा करतो, असेही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. (devendra fadnavis wrote cm uddhav thackeray over Attack on businessman in aurangabad)
VIDEO : 100 Super Fast News100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 18 August 2021https://t.co/i1f1jjtCtb#100SuperFastNews #NewsBulletin #TV9
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 18, 2021
संबंधित बातम्या:
नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग झाल्यानं डॉक्टरचा मृत्यू? अमित देशमुखांचे चौकशीचे आदेश
शिवसेनेच्या रॅलींमधून कोरोना पसरत नाही का?; कपिल पाटलांचा राऊतांवर पलटवार
ही तर ‘जन छळवणूक यात्रा’; महापौर किशोरी पेडणेकर यांनी उडवली जन आशीर्वाद रॅलीची खिल्ली
(devendra fadnavis wrote cm uddhav thackeray over Attack on businessman in aurangabad)