दलाल घुसल्यामुळेच परीक्षा रद्द झाल्याची शंका, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

Maharashtra health department recruitment 2021 : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दलाल घुसल्यामुळेच आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांकडे 5, 10 ते 15 लाख रुपयांची मागणी करुन, भरती करण्याचं आश्वासन दिलं जात आहे. त्यामुळे परीक्षा रद्द का झाली याची तर चौकशी व्हायलाच हवी, पण या दलालांचाही शोध घेऊन आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

दलाल घुसल्यामुळेच परीक्षा रद्द झाल्याची शंका, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
DEVENDRA FADNAVIS
Follow us
| Updated on: Sep 25, 2021 | 11:39 AM

मुंबई : आरोग्य विभागाच्या क आणि ड वर्गासाठी (health department exam) होणारी 25 आणि 26 सप्टेंबरला होणारी परीक्षा अचानक पुढे ढकलण्यात आली. आज होणारी परीक्षा रद्द झाल्याची माहिती, विद्यार्थ्यांना ऐनवेळी काल रात्री मेसेज आणि मेलद्वारे कळवण्यात आली. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आयटी कंपनीकडे बोट दाखवलं आहे. तसंच झाल्या प्रकारामुळे दिलगिरी व्यक्त केली आहे.

दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दलाल घुसल्यामुळेच आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांकडे 5, 10 ते 15 लाख रुपयांची मागणी करुन, भरती करण्याचं आश्वासन दिलं जात आहे. त्यामुळे परीक्षा रद्द का झाली याची तर चौकशी व्हायलाच हवी, पण या दलालांचाही शोध घेऊन आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

आदल्या रात्री विद्यार्थ्यांना समजतं परीक्षा रद्द झाली, या सरकारचा घोळ काही समजत नाही. प्रवेश पत्र यूपीमधलं मिळतं. सगळंच कन्फ्युजन आहे, काही दलाल मार्केटमध्ये आलेले आहेत, या पदांसाठी त्यांच्यापासून 5 लाख, 10 लाख गोळा करण्याचे प्रकार घडत आहेत, हे गंभीर आहे, या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावं, विद्यार्थ्यांचं नुकसान बंद करा, अन्यथा आंदोलन करु, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

या प्रकरणाची 100 टक्के चौकशी व्हावी, हे दलाल कोण आहेत ते समोर आलं पाहिजेत. विद्यार्थ्यांकडे पैसे मागितले जात आहेत त्याची चौकशी व्हावी. परीक्षा रद्द होण्यासाठी कोणीही घोळ केला असेल तर कारवाई झालीच पाहिजे, सरकार जबाबदारी झटकू शकत नाही, सर्वत्र घोळच घोळ सुरु आहे, या सरकारला घोळ सरकार म्हणायचं का? हा दलालीचा नवा अध्याय सुरु होईल, परीक्षेतील घोळ आहे की सरकारचा घोळ आहे? याची चौकशी करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

परीक्षा ऐनवेळी रद्द

राज्यात आज आणि उद्या (शनिवार आणि रविवार ता. 25 आणि 26 सप्टें) आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा (Maharashtra Health Department Exam) घेतली जाणार होती. मात्र कंपनीच्या असमर्थततेमुळे परीक्षा रद्द केल्याची प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली. अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा या परजिल्ह्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकजण खबरदारी म्हणून आधीच परीक्षा केंद्रावर पोहोचले होते. तर काही विद्यार्थी अजूनही प्रवासात होते. शासनाने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थी संताप व्यक्त करतायत. परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी माफी मागतो, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

परीक्षा होणारच : राजेश टोपे

आयटी कंपनीने असमर्थता दाखवली, त्यामुळे पर्याय नव्हता. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्याशी रात्री उशिरापर्यंत चर्चा झाल्यानंतर आज-उद्याची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांशी झालेल्या त्रासाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आरोग्य विभागाशी संबंधित जरी थेट हा विषय नसला तरी आयटी विभागाने दाखवलेल्या असमर्थतेमुळे ही वेळ आली. पण परीक्षा रद्द झालेली नाही, परीक्षा नियोजित पद्धतीने होणार, परीक्षा लांबणीवर पडली आहे, न्यासा कंपनीने असमर्थता दाखवली, या कंपनीने आता दहा दिवसांचा वेळ मागितला आहे, त्यामुळे ही परीक्षा होणारच आहे, ठरलेल्या जागा भरल्या जाणार आहेत, असं राजेश टोपे म्हणाले.

VIDEO : देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

संबंधित बातम्या 

आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलली, विद्यार्थ्यांना त्रास झाला, मनापासून माफी मागतो, आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

जमत नसेल तर खुर्च्या खाली करा, लगोलग विद्यार्थ्यांची नुकसान भरपाई द्या, आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराने भाजप आक्रमक

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.