पोलिसांच्या तपासानंतर धनंजय मुंडेंसमोर कायदेशीर पर्याय कोणते?
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्कारांचे आरोप झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Dhananjay Munde rape case: what is legal option?)
मुंबई: राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्कारांचे आरोप झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच या प्रकरणामुळे मुंडे यांची राजकीय कारकिर्दवरही संकट ओढवलेले आहे. त्यामुळे मुंडेंसमोर आता कोणते राजकीय पर्याय आहेत, त्यावर टाकलेला हा दृष्टीक्षेप. (Dhananjay Munde rape case: what is legal option?)
दोन प्रकरणे, दोन मार्ग
धनंजय मुंडे यांची सध्या दोन प्रकरणे चर्चेत आहेत. करुणा शर्मा आणि रेणू शर्मा या दोन्ही बहिणींचीही प्रकरणे आहेत. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंना कोर्टात खेचलं आहे. तर दुसऱ्या प्रकरणात रेणू शर्माने मुंडेंविरोधात बलात्काराचा आरोप केला आहे. पहिलं प्रकरण कोर्टात असल्याने त्यावर मुंडे सुद्धा कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जात आहेत. दुसऱ्या प्रकरणात मुंडेंवर बलात्काराचा आरोप झाला असून त्याचा पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात पोलीस कशा पद्धतीने तपास करतात त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.
तक्रारी मागचा हेतू काय?
रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडेंविरोधात तक्रार दाखल केली आहे. 2006 मध्ये घडलेल्या गुन्ह्याबाबत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे रेणू शर्मा यांचा आत्ताच गुन्हा दाखल करण्याचा हेतू काय? याचा तपासही पोलीस करतील, त्यावरच हे सर्व प्रकरण अवलंबून असेल असं जाणकारांचं म्हणणं आहे. मुंडे मंत्री झाल्यावरच या महिलेला उपरती का सूचली? एखाद्या व्यक्तीवर तो प्रसिद्ध झाल्यावरच आरोप का होतात? असे प्रश्नही जाणकार उपस्थित करत आहेत. (Dhananjay Munde rape case: what is legal option?)
पोलिसांचाच रोल महत्त्वाचा
मुंडेंकडे सध्या वाचण्यासाठी कोणताही पर्याय नाही. पोलीस काय कारवाई करतात त्यावर सर्व अवलंबून आहे. अनेकदा पोलीस सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असतात. त्यामुळे पोलीस काय भूमिका घेतात यावर बहुतेक गोष्टी अवलंबून आहेत, असं काही जाणकारांचं म्हणणं आहे. तर खरा अँगल आणि खोटा अँगल हे शोधल्यानंतरच सर्व गोष्टी स्पष्ट होईल. आता या प्रकरणात पोलिसांचा मेन रोल आहे. मंत्र्यांचा काहीही रोल नाही, असंही जाणकारांनी सांगितलं. (Dhananjay Munde rape case: what is legal option?)
Dhananjay Munde Case | धनंजय मुंडेंचा छळ झाला, ते त्रासात होते : जयंत पाटीलhttps://t.co/v24xJEMIGb#jayantpatil | #DhananjayMunde | #ncp | @Jayant_R_Patil
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 15, 2021
संबंधित बातम्या:
धनंजय मुंडेंवरचं राजीनाम्याचं गंडांतर तूर्तास टळलं; राष्ट्रवादीची वेट अँड वॉच भूमिका
Dhananjay Munde LIVE: महिलेला ब्लॅकमेलिंग करण्याची सवय असल्याचे प्रतिबिंबित होतेय : जयंत पाटील
Dhananjay Munde | बलात्काराच्या आरोपांनंतरही धनंजय मुंडेंवरील कारवाई राष्ट्रवादीने का टाळली?
(Dhananjay Munde rape case: what is legal option?)