…तर लगेच राजीनामा, धनंजय मुंडे यांनी अखेर सोडले मौन, विरोधकांवर केला हा आरोप
Dhananjay Munde on Resign : मंत्री धनंजय मुंडे हे राजीनामा देतील, अशी चर्चा काल रंगली होती. पण अजितदादांनी या सर्व चर्चांना विराम दिला. तर मुंडे यांनी पण राजीनामा प्रकरणात मौन सोडले आहे. काल त्यांची देहबोली आणि सडेतोड उत्तरं बरंच काही सांगून जात होते.
![...तर लगेच राजीनामा, धनंजय मुंडे यांनी अखेर सोडले मौन, विरोधकांवर केला हा आरोप ...तर लगेच राजीनामा, धनंजय मुंडे यांनी अखेर सोडले मौन, विरोधकांवर केला हा आरोप](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Dhananjay-Munde-on-Resign-1.jpg?w=1280)
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा लावून धरण्यात येत आहे. आकाचे आका कोण ? असा सवाल सातत्याने विचारण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना मुंडेंविरोधात पुरावे दिले होते. त्यानंतर मुंडे यांच्या राजीनाम्याच्या चर्चेला अधिक हवा मिळाली. पण अजितदादांनी या सर्व चर्चांना विराम दिला. तर मुंडे यांनी पण राजीनामा प्रकरणात मौन सोडले आहे. काल त्यांची देहबोली आणि सडेतोड उत्तरं बरंच काही सांगून जात होते.
तर लगेच राजीनामा देणार
काल देवगिरीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली. त्यावेळी पक्ष आणि अजितदादांनी आदेश दिला तर लगेच राजीनामा देईल अशी थेट भूमिका मंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केली. देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसमोर त्यांनी ही भूमिका घेतली. माझ्या संदर्भात काय करायचं ते अजितदादाच ठरवतील असे ते म्हणाले.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Nagpur-Crime-What-Happens-After-Death-Online.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Gold-Silver-Rate-Today-29-January-2025.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Pandharpur-Temple-Visit.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/ISRO-NVS-02-Orbit-GSLV-F15-Navigation-Satellite.jpg)
काल त्यांची देहबोली हा माध्यमांचा विषय झाला होता. गेल्या दीड महिन्यांहून अधिक काळापासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्य ढवळून निघाले आहे. प्रकरणात मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावण्यात आला आहे. तर आकाचा आका कोण? त्याचा शोध घ्या, असे बीडमधील सत्ताधारी आणि विरोधी गोटातील आमदारांनी मागणी केली आहे.
वैयक्तिक रागातून आरोप
काही जण माझ्यावर वैयक्तिक रागातून आरोप करत आहेत, असे मत धनंजय मुंडे यांनी मांडले. अंजली दमानिया यांच्यासोबत झालेल्या बैठकीची माहिती अजितदादांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना दिली. दमानिया यांनी दिलेली सर्व कागदपत्रे ही मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती दादांनी दिल्याची माहिती समोर येत आहे.
ही तर मिलीभगत
दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. ही सर्व मिलीभगत असल्याचा आरोप त्यांनी केला. कुणाचा काय संबंध आहे हे अजितदादा नाही तर कोर्ट सांगेल, असे राऊत म्हणाले. न्यायासाठी जे लढत आहेत. त्यांच्यावर दबाव आणल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.