Dhananjay Munde: इंदू मिलमधील आंबेडकर स्मारक कधी पूर्ण होणार?; धनंजय मुंडे यांनी सांगितली डेडलाईन

Dhananjay Munde: 2016साली जेव्हा प्रकल्प हाती घेण्याचे ठरवले तेव्हा याची किंमत सहाशे कोटी होती. मागील दोन वर्षात महाविकास आघाडीच्या सरकारने पुढाकार येऊन हे काम केले आहे.

Dhananjay Munde: इंदू मिलमधील आंबेडकर स्मारक कधी पूर्ण होणार?; धनंजय मुंडे यांनी सांगितली डेडलाईन
इंदू मिलमधील आंबेडकर स्मारक कधी पूर्ण होणार?; धनंजय मुंडे यांनी सांगितली डेडलाईनImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 3:22 PM

मुंबई: दादरच्या इंदू मिलमधील (indu mill) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (babasaheb ambedkar) यांच्या स्मारकाच्या कामाची राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांनी आंबेडकर स्मारकाची डेडलाईनही दिली. 2023 अखेरपर्यंत किंवा 2024 सुरुवातीपर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत, असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं. आतापर्यंत या प्रकल्पावर 245 कोटी रुपये खर्च झाले आहेत. जवळपास अडीच कोटी रुपयांचा निधी या वर्षी आपण या प्रकल्पासाठी ठेवला आहे. या प्रकल्पासाठी या वर्षी 300 कोटी रुपये खर्च झाला. त्या निधीची तरतूद सामाजिक न्याय विभागाकडून करण्यात आली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकची वाट संपूर्ण देश पाहतोय, असंही धनंजय मुंडे यांनी सांगितलं. मुंडे यांच्या सोबत सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी आणि या प्रकल्पाशी संबंधित अधिकारीही उपस्थित होते. यावेळी त्यांनी संबंधितांना काही सूचनाही केल्या.

2016साली जेव्हा प्रकल्प हाती घेण्याचे ठरवले तेव्हा याची किंमत सहाशे कोटी होती. मागील दोन वर्षात महाविकास आघाडीच्या सरकारने पुढाकार येऊन हे काम केले आहे. 2023 अखेरीस किंवा 2024 च्या पहिल्या क्वार्टर मध्ये या स्मारकाचं काम पूर्ण होईल. या कालावधीत स्मारकाचं लोकार्पण होईल अशा पद्धतीने आम्ही जलद गतीने काम सुरू ठेवले आहे. ज्या पिलरवर स्मारक होणार आहे, त्या पिलर्सचं काम 75 फुटापर्यंत पूर्ण झालं आहे. आणखी 25 फुटाचा काम बाकी आहे. स्मारकापर्यंत जाण्यासाठी किती प्रदक्षिणा घालायची आहे त्याचं स्ट्रक्चरचं काम बाकी आहे. एक हजार लोकांची क्षमता असलेल्या वातानुकूलित ऑडिटोरियमचं काम सुद्धा सुरू आहे. स्मारकाच्या खाली पार्किंगचा काम सुद्धा सुरू आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले. आपण किती टक्के काम पूर्ण झालं हे आताच सांगता येणार नाही. पैशाची कुठलीही अडचण या कामासाठी होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

प्रकल्पात अंतर्भूत असलेल्या बांधकामाची वैशिष्ट्ये

  1. प्रवेशद्वार इमारती मध्ये माहिती सेंटर, तिकीट घर, लॉकअप रूम, प्रसाधनगृह, सुरक्षा गृह, स्मरणिका कक्ष, उपग्रह व नियंत्रण कक्ष त्यासोबतच इतर बाबींचा समावेश
  2. स्मारकाची उंची 450 फुट ( पदपीठ उंची 100 फूट, वरती पुतळ्याची उंची 350 फूट )
  3. प्रेक्षागृह आसनक्षमता 1000
  4. संशोधन केंद्र, व्याख्यान वर्ग व ग्रंथालय
  5. ध्यान केंद्र
  6. तळघर वाहन तळ (पार्कींग क्षमता 460वाहने)
नितेश राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नितेश राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.