“पंकजा मुंडेंची मागणी योग्यच, धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा”
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा ही भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेली मागणी रास्तच आहे. (dhananjay munde should resign says pravin darekar)
मुंबई: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा ही भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेली मागणी रास्तच आहे. महाविकास आघाडीतील एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा न्याय नको. त्यामुळे मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. (dhananjay munde should resign says pravin darekar)
प्रवीण दरेकर यांनी विधान भवनात प्रसारमाध्यमांशी बोलताना ही मागणी केली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर दबाव आणल्यानंतर त्यांनी 20 दिवसानंतर मंत्र्याचा राजीनामा घेतला. विरोधी पक्ष, जनता आणि मीडियाचा दबाव वाढला नसता तर त्यांनी राजीनामा घेतला नसता. पण उशिरा का होईना नैतिकतेच्या आधारे मंत्र्याचा राजीनामा घेतला. आता पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. पंकजा यांची मागणी रास्तच आहे. नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून मुंडेंनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता. महाविकास आघाडीतच एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय नको, असं सांगत मुंडे यांनीही त्वरीत राजीनामा द्यावा. राष्ट्रवादीने त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या?
धनंजय मुंडेंचा निर्णय त्यांच्या पक्षाने घ्यावा. त्यांनी भूमिका ही नैसर्गिक घ्यायला पाहिजे. धनंजय मुंडे प्रकरणाचं समर्थन करू शकत नाही. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ही आमच्या पक्षाचीही मागणी आहे. राजकारणात काय पायंडे चाललेत ते स्त्रियांच्या दृष्टीने दुर्दैवी आहेत. झगडणाऱ्या स्त्रीसाठी, चांगला काम करणाऱ्या स्त्रीसाठी एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. जर कोणावर अशा प्रकारचं बोट दाखवलं गेलंय. त्यांनीच स्वतःची भूमिका ही स्वतःहून घेतली पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे. मग राजकीय जीवनामध्ये लोक त्यांच्याकडे मान उंचावून बघतील. व्यक्तिगतही मी या गोष्टीचं कधीच समर्थन करू शकत नाही. ज्यांच्यावर आरोप होतात, त्यांनीच भूमिका घ्यायला हवी, असंही त्या म्हणाल्या.
सरकार टिकविण्याचा आटापिटा नको
सरकार टिकवण्यासाठी किंवा एखादी आघाडी टिकवण्यासाठी काही लोकांना पाठिशी घालणं योग्य नाही. त्यामुळेच पूजा चव्हाण प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी. कोणत्याही दबावाखाली हा तपास होऊ नये. सध्या या प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीने सुरू आहे तो समाधानकारक नाही. त्यामुळेच देशालाही आदर्श घालून दिला जाईल असा या प्रकरणाचा तपास करण्यात आला पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.
काय आहे धनंजय मुंडे प्रकरण?
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात तरुणीने ओशिवरा पोलीस ठाण्यात 10 जानेवारी रोजी तक्रार केली होती. या प्रकरणी 11 जानेवारी रोजी मुंबई पोलिसांकडून अर्ज स्वीकारण्यात आला. 2006 पासून अत्याचार सुरु असल्याचा दावा तिने केला आहे. बॉलिवूडमध्ये संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. या तक्रारीबाबत समाजमाध्यम आणि प्रसारमाध्यमांवर वृत्त समोर आल्यानंतर स्वत: मुंडे यांनी फेसबुकवर या प्रकरणावर आपली भूमिका मांडली. (dhananjay munde should resign says pravin darekar)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 2 March 2021https://t.co/Eh9aJf1qAh#mahafastnews | #news | #news
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 2, 2021
संबंधित बातम्या:
धनंजय मुंडेंच्या कबुलीनाम्यावर परळीकर काय म्हणतायत?
बलात्कार प्रकरण भोवणार?; धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीचं नेमकं काय होणार?
….. तर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद मुख्यमंत्रीही वाचवू शकणार नाहीत
(dhananjay munde should resign says pravin darekar)