Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhangar Reservation | मुंबईत तोडगा नाही, ‘सह्याद्री’वरील खलबतं निष्फळ, धनगर आरक्षणाचा प्रश्न तापला

धनगर आरक्षणाचा प्रश्न आता प्रचंड तापला आहे. अहमदनगरच्या चौंडी येथे धनगर समाजाचे कार्यकर्ते सुरेश बंडगर यांचं गेल्या सहा दिवसांपासून उपोषण सुरु आहे. त्यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक पार पडली.

Dhangar Reservation | मुंबईत तोडगा नाही, 'सह्याद्री'वरील खलबतं निष्फळ, धनगर आरक्षणाचा प्रश्न तापला
Follow us
| Updated on: Sep 21, 2023 | 4:55 PM

मुंबई | 21 सप्टेंबर 2023 : धनगर समाजाचे कार्यकर्ते आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. राज्यातील धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, अशी या कार्यकर्त्यांची मागणी आहे. या मागणीसाठी धनगर समाजाचे कार्यकर्ते सुरेश बंडगर यांचं अहमदनगरच्या चौंडी येथे गेल्या सहा दिवसांपासून उपोषण सुरु आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. त्यांनी उपोषण मागे घ्यावं, यासाठी आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे महत्त्वाची बैठक पार पडली. धनगर समाजाचे कार्यकर्ते या बैठकीसाठी आले होते. या बैठकीला स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. पण ही बैठक निष्फळ ठरली आहे.

राज्य सरकारसोबत बैठक पार पडल्यानंतर यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतोले यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “तीन महिन्याच्या काळात काही राज्यांमधील धनगर समजाला आरक्षण देण्यात आलं आहे. त्याबाबत अभ्यास करु आणि महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाला आम्ही न्याय देऊ, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. पण त्याला खूप वेळ लागणार आहे. खूप मोठी प्रक्रिया आहे. आमचा ठोस निर्णय होणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरु राहणार”, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब दोडतोले यांनी दिली.

‘आमरण उपोषण सुरुच राहणार’

“मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सर्व सकारात्मक होते. पण निकाल काहीच नाही. फक्त गोड बोलल्याने आणि सकारात्मक भावना दाखवल्यानंतर गेल्या 70 वर्षात धनगर समाजाला न्याय मिळाला नाही. आजसुद्धा ठोस निर्णय झाला नाही. हे सरकार आपल्याकडे चांगल्या भावनेने बघतंय पण निर्णय अंमलात आणत नाही. आपल्याला लोकशाही पद्धतीने सर्व मार्गाने उपोषण चालू ठेवालं लागेल. आमरण उपोषण हे सुरुच आहे”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

या बैठकीतील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर चौंडी येथे उपोषणाला बसलेले सुरेश बंडगर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. “मी तुम्हाला सकाळीच सांगितलं होतं की, भाजप सरकार हे धनगर विरोधी आहे. त्यांना धनगरांना आरक्षण द्यायचं नाही. जे त्यांनी केलं तेच यांना करायचं आहे. मी दहा वर्षे बघितलं. त्यांना आरक्षण द्यायचं नाही. पण आम्ही उपोषण करणार”, अशी प्रतिक्रिया सुरेश बंडगर यांनी दिली.

“आम्ही 2024 ला शंभर टक्के भाजपला सत्तेतून खाली खेचणार. माझा मृत्यू झाला तरी काही हरकत नाही. आमच्या समाजाची अत्यंत वाईट अवस्था आहे. त्यामुळे मी आमरण उपोषण सुरुच ठेवणार”, असं सुरेश बंडगर म्हणाले.

गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया

दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे देखील या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीनंतर गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्ही चार राज्यांचे जीआर दाखवले. राज्य सरकार दोन दिवसात धनगर आणि धनगड याचा अभ्यास करण्यासाठी दोन दिवसात समिती नेमणार आहे. सरकारने दोन महिन्यांचा वेळ मागितला आहे. ज्या राज्यात या सुधारणा करण्यात आल्या त्या राज्यात समिती जाऊन अहवाल तयार करणार आहे”, अशी प्रतिक्रिया गोपीचंद पडळकर यांनी दिली.

धक्कादायक! .. म्हणून कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये कुत्रा बनवून फिरवलं
धक्कादायक! .. म्हणून कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये कुत्रा बनवून फिरवलं.
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला.
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?.
'ऑर्गनायजर'मधल्या 'त्या' लेखाने राजकीय वादंग
'ऑर्गनायजर'मधल्या 'त्या' लेखाने राजकीय वादंग.
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले.
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला.
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.