धारावी विधानसभा मतदारसंघ: काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला कोण लावणार सुरुंग?
Dharavi Assembly Constituency: धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला माहित आहे का की या मतदारसंघावर आधीपासूनच काँग्रेस वरचढ राहिली आहे. चार वेळा आमदार राहिलेल्या वर्षा गायकवाड या आता खासदार झाल्याने त्यांची जागी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
मुंबईतील दक्षिण मध्ये लोकसभा मतदारसंघात येणारा धारावी विधानसभा मतदारसंघ महत्त्वाच्या मतदारसंघापैकी एक आहे. या मतदारसंघाची स्थापना १९७८ साली झाली होती. हा मतदारसंघ आधीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ली राहिला आहे. या मतदारसंघातून काँग्रेसचे दिवंगत नेते एकनाथ गायकवाड यांनी तीन वेळा प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांची कन्या वर्षा गायकवाड यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ४ वेळा त्या आमदार झाल्या आहेत. पण वर्षा गायकवाड या लोकसभेवर निवडून गेल्याने आता काँग्रेसकडून कोणता उमेदवार रिंगणात असेल याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महाविकासआघाडीला चांगलं लीड मिळाले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ही जागा लढणं काँग्रेसासाठी सोपं जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत अनिल देसाई यांनी धारावीत ७६ हजार मते मिळाली होती. तर राहुल शेवाळे यांना ३९ हजार मते मिळाली होती.
या मतदारसंघावर शिवसेनेची ही चांगली पकड आहे. त्यामुळेच आतापर्यंत शिवसेनेनेच या मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. यंदा ही ही जागा महायुतीतील शिंदे गटालाच सुटण्याची शक्यता जास्त आहे. कारण धारावी पुनर्विकास प्रकल्पामुळे या मतदारसंघात भाजप विरोधात वातावरण आहे. २०२९ च्या विधानभा निवडणुकीत वर्षा गायकवाड यांच्याविरोधात शिवसेनेच्या आशिष मोरे यांनी निवडणूक लढवली होती.
या मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे येथे आतापर्यंत काँग्रेसला मोठा फायदा झाला आहे. या मतदारसंघात मुस्लीम मतं ८५ हजार म्हणजेच ३३ टक्के आहेत. तर दुसऱ्या क्रमाकांवर नाडर समाज आहे. ज्यांची ९ हजार म्हणजेच ३.८ टक्के मतं आहेत. तर ख्रिस्ती मतदारांची संख्या ६१५० (२.४ टक्के) आहे.
धारावी मतदारसंघावर काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी दावा केला आहे. या मतदारसंघातून ज्योती गायकवाड यांना उमेदवारी मिळावी म्हणून वर्षा गायकवाड आग्रही आहेत. ज्योती गायकवाड या वर्षा गायकवाड यांची बहीण आहे.
२०१९ विधानसभा निवडणुकीचा निकाल
उमेदवार | पक्ष | मतं |
वर्षा गायकवाड | काँग्रेस | ५३,९५४ |
आशिष मोरे | शिवसेना | ४२,१३० |
मनोज संसारे | एआयएमआयएम | १३,०९९ |
२०१४ विधानसभा निवडणुकीचा निकाल
उमेदवार | पक्ष | मतं |
वर्षा गायकवाड | काँग्रेस | ४७,७१८ |
बाबुराव माने | शिवसेना | ३२,३९० |
दिव्या ढोले | भाजपा | २०,७५३ |
२००९ विधानसभा निवडणुकीचा निकाल
उमेदवार | पक्ष | मतं |
वर्षा गायकवाड | काँग्रेस | ५२,४९२ |
मनोहर राबगे | शिवसेना | ४२,७८२ |