VIDEO: मुख्यमंत्र्यांना माहिती आहे की नाही माहीत नाही, राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांची सावध प्रतिक्रिया, सोमय्यांवरील कारवाईवर आघाडीत मतभेद?

शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवरील कारवाईचा मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंध नाही. गृहमंत्रालयाने ही कारवाई केली आहे, असं आज वारंवार स्पष्ट केलं. (dilip walse patil)

VIDEO:  मुख्यमंत्र्यांना माहिती आहे की नाही माहीत नाही, राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांची सावध प्रतिक्रिया, सोमय्यांवरील कारवाईवर आघाडीत मतभेद?
dilip walse patil
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 4:23 PM

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवरील कारवाईचा मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंध नाही. गृहमंत्रालयाने ही कारवाई केली आहे, असं आज वारंवार स्पष्ट केलं. त्यामुळे आघाडीत मतभेद निर्माण झाल्याचं चित्रं असतानाच आता गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी त्यावर सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सोमय्यांवरील कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती आहे की नाही माहीत नाही, असं दिलीप वळसे-पाटील म्हणाले. त्यामुळे आघाडीत समन्यवाचा अभाव असल्याचं उघड झालं आहे. (dilip walse patil reaction on action against kirit somaiya)

किरीट सोमय्या यांना कराडमध्ये अडवण्यात आल्याच्या घटनेवर दिलीप वळसे-पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नॉर्मली अशी घटना घडते तेव्हा वरिष्ठ अधिकारी गृहमंत्र्यांना ब्रिफिंग करतात आणि मुख्यमंत्र्यांनाही ब्रिफिंग करत असतात. मात्र या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना ब्रिफिंग केलं की नाही केलं मला माहिती नाही, असं सांगतानाच कालच्या घटनेशी मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही. कारवाईचा जो काही निर्णय आहे, तो गृहमंत्रालयाने घेतला आहे ही वस्तुस्थिती आहे, असं वळसे पाटील म्हणाले.

राऊत यांनी काय म्हटलं होतं?

शिवसेना नेते संजय राऊत यांनी या प्रकरणावर भाष्य करताना या कारवाईवरून हात झटकला होता. कालपासून जे काही घडतंय किंवा घडवलं जातंय त्यामागे केंद्र सरकार आहे. विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, केंद्राच्या पाठबळावर राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा प्रकारचे आरोप करून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणं हा विरोधी पक्षांचा उपक्रम आहे. त्याला धंदा म्हणणार नाही, असं सांगतानाच आरोप करणाऱ्यांवर काल जी काही कारवाई झाली आहे. ती गृहमंत्रालयाने केलेली कारवाई आहे. त्यात आकस किंवा सूड या शब्दांचा वापर कोणी करू नये. मी सकाळी पूर्ण माहिती घेतली. गृहमंत्रालयाला कायदा आणि सुव्यवस्थेबाबत दोन्ही बाजूने काही प्रश्न निर्माण होतील असं वाटलं म्हणून ही कारवाई झाली. त्यात मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याचं कारण नाही. मुख्यमंत्र्यांनी ही कारवाई केली म्हणून त्याकडे पाहू नये. मुख्यमंत्री अशा लहान गोष्टीत पडत नाही. कोणी अशा प्रकारचे खोटेनाटे आरोप केले, बुडबुडे सोडले म्हणून आमच्या सरकारला भोकं पडत नाही हे आम्हाला माहीत आहे, असं राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले, माझ्या कार्यालयाचा संबंध नाही

सोमय्यांनी केंद्रसरकारवर बोलावं. इतर राज्यातील भाजपची सरकारं आहेत. त्यावर बोलावं. तुमच्याकडे आरोप करण्यापूर्वी पुरावे असतील तर महाराष्ट्रात पोलीस आहे, यंत्रणा आहेत, लाचलूचपत विभाग आहे. या संस्था पक्षपात न करता काम करत असतात. पण तुम्ही केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, त्यांच्या आदेशाने केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने महाराष्ट्रातील मंत्री आणि नेत्यांवर आरोप करत आहात. त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रयत्न होत असेल तर राज्याचं गृहमंत्रालय कारवाई करत असतं. कालपासून मी पाहतो ही राज्याच्या गृहमंत्रालयाने केलेली कारवाई आहे. त्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्याची गरज नाही. मी मुख्यमंत्र्यांशी बोललो. त्यांनी सांगितलं या कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही. गृहमंत्रालयाला काही ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांनी कारवाई केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, असं ते म्हणाले.

किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावरील कारवाईवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं होतं. “हे सगळं उद्धव ठाकरे यांच्या दडपशाहीमुळे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आदेशाने होत आहे, आमचं चॅलेंज त्यांना आहे. माझी पहिली हरकत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना आहे. पहिली जबाबदारी गृहमंत्री वळसे पाटील यांची आहे.” “ठाकरे सरकार कितीवेळा दडपशाही करणार? हसन मुश्रीफांच्या घोटाळ्याविरोधात कागल पोलीस स्टेशनमध्ये जात होतो. सरसेनापती कारखाना त्या हद्दीत येतो. मी तक्रार केल्यानंतर ७ दिवसात कोर्टात जाऊ शकतो. मी अंबाबाईचं दर्शन घेणार हे तीन दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं होतं. अंबाबाईचं दर्शन बाहेरुन करणार होतो.”, असंही सोमय्या म्हणाले. (dilip walse patil reaction on action against kirit somaiya)

संबंधित बातम्या:

गडहिंग्लज कारखान्यातही 100 कोटींचा घोटाळा, हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांचा दुसरा हल्ला, उद्या तिसरा घोटाळा बाहेर काढणार

Kirit Somaiya Live : हसन मुश्रीफांनी आणखी 100 कोटींचा घोटाळा केला, सोमय्यांचा दुसरा हल्ला

उद्धव ठाकरेंच्या 19 बंगल्यांचा घोटाळा, अजित पवारांच्या जरंडेश्वर कारखान्याची पाहणी करणार, रोक सके तो रोक लो : किरीट सोमय्या

(dilip walse patil reaction on action against kirit somaiya)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.