दिशा सालियनच्या अंत्यविधीवेळचे फोटो पहिल्यांदाच समोर… चेहरा काय सांगतो? खरंच 14 व्या मजल्यावरून पडून झाला मृत्यू? कुटुंबियांचा दावा काय?
Disha Salian Death : बॉलिवूड सेलिब्रिटी टॅलेंट मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरण अडीच वर्षांनी पुन्हा बाहेर आले आहे. तिच्या वडिलांसह कुटुंबियांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यात गंभीर आरोप करण्यात आले आहे. दरम्यान तिच्या अंत्यविधीवेळेच्या फोटोने या प्रकरणात वादळ आणलं आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी टॅलेंट मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरण अडीच वर्षानंतर पुन्हा मोठं वादळ घेऊन आले आहे. त्याचे राजकीय पडसाद राज्यात उमटण्याची शक्यता आहे. आज सकाळपासूनच शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांमध्ये त्यावरून जुंपली आहे. तर दिशाच्या अंत्यविधीवेळचे फोटो पहिल्यांदाच समोर आल्यानंतर मोठा गदरोळ उठला आहे. 14 व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत होता. पण अंत्यविधीचे फोटो काही दुसरंच सांगत असल्याचा दावा तिचे कुटुंबिय करत आहेत.
वडिलांची हायकोर्टात याचिका
दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात तिच्यावर सामूहिक बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. त्यात आदित्य ठाकरे यांच्यासह इतर काही अभिनेत्यांचे नाव घेण्यात आले आहे. याप्रकरणी चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तर मुंबईच्या मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरीही याचिकेत दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.




अंत्यविधीचे फोटो सांगतील सत्य?
१४ व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाल्याचा आतापर्यंत दावा करण्यात येत होता. पण पहिल्यांदाच दिशा सालियन हिच्या अंत्यविधी वेळेचे फोटो समोर आले आहे. त्यावरून आता नवीन वादळ येण्याची शक्यता आहे. दिशा सालियनचा मृत्यू पाच वर्षांपूर्वी ८ जून २०२० रोजी झाला होता. पण ही आत्महत्या होती की हत्या होती, यावरून वाद सुरू आहे. मध्यल्या काळात एसआयटी मार्फत तपास करण्यात आला. तरीही आरोप सुरूच होते.
चेहरा सांगतो काय?
तिच्या मृत्यूनंतर अखेरच्या काळातील तिचे कुठलेही फोटो या काळात कधीही समोर आले नव्हते. मात्र दिशाच्या अंत्यविधी वेळेचे दोन फोटो समोर आले आहेत. या दोन्ही फोटोत तिचा चेहरा स्पष्टपणे दिसतो. तिच्या संपूर्ण शरीरावर कफन आहे. पण तिचा चेहरा उघडा आहे. तिच्या चेहऱ्यावर कुठलीही इजा झालेले नाही हे स्पष्टपणे दिसते.
त्यामुळे तिच्या कुटुंबियांना आता आरोप केला आहे की, १४ व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाला आहे तर तिच्या चेहर्यावर एकही जखम का नाही? तिच्या चेहर्याला साधं खरचटलं सुद्धा नाही. या सर्व तर्कासह आणि फोटोच्या आधारावरून दिशाचे वडील सतिश सालियन हिच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यावरून आता पुन्हा राज्यातील राजकारण तापले आहे.