भाजपच्या बैठकीत दादा-शिंदेंवर नाराजी? भाजप हायकमांडच्या सूचना काय
भाजपच्या कोअर कमिटी बैठक आज पार पडलीय. या बैठकीत काही जणांनी शिंदे आणि अजितदादांबद्दल नाराजी वर्तवली आहे. आगामी रणनिती आणि लोकसभेतल्या नुकसानीबद्दल या बैठकीत चिंतन केलं गेलं. विधानसभा तोंडावर असताना भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत काही नेत्यांनी अजितदादा आणि शिंदेंबद्दल नाराजी वर्तवली.
भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत काही जणांनी शिंदे आणि अजितदादांबद्दल नाराजी वर्तवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी विधानसभांसाठी ही बैठक होती. ज्यात आगामी रणनिती आणि लोकसभेतल्या नुकसानीबद्दल चिंतन केलं गेलं. लोकसभेत फटका बसल्यानंतर आता विधानसभा तोंडावर असताना भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत काही नेत्यांनी अजितदादा आणि शिंदेंबद्दल नाराजी वर्तवल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. त्यानुसार लोकसभेत शिंदेंना १५ जागा देण्याची काहीही गरज नव्हती त्याचा आता विधानसभा जागावाटपात त्रास होऊ शकतो तर अजित पवारांच्या आमदारांनी अनेक ठिकाणी भाजपला मदत न केल्याचा आरोपही भाजपच्या काही नेत्यांनी केलाय.
दिंडोरी, पुणे सातारा, सांगली, सोलापूर आणि बुलढाण्यात अजित पवारांच्या आमदारांनी महायुतीऐवजी मविआचं काम केलं. आणि जालना-पालघरमध्ये शिंदेंच्या काही नेत्यांनी भाजपला मदत न केल्याचा सूर बैठकीत उमटला. मात्र या सगळ्या चर्चा खोट्या असून यात काहीही तथ्य नसल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्र यादव., प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, गिरीश महाजनांसह इतर नेते उपस्थित होते. दुसरीकडे मविआप्रमाणेच महायुतीत जागांवरुन दावेदारी सुरु झाली आहे. महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेनं 126 जागांवर दावा केल्याची माहिती आहे. तर भाजपनं 160 ते 170 जागा लढाव्यात अशी मागणी कोअर कमिटीत करण्यात आली. आणि अजित पवार गटानं 80 ते 85 जागांवर दावा सांगितल्चं समोर येतंय.
दरम्यान, भाजप हायकमांडनं दिलेल्या सूचनेनुसार विधानसभेत महायुती म्हणून लढायचं आहे. महायुतीत भाजपची ताकद प्रकर्षानं दाखवा. भाजप किती जागा लढणार, यापेक्षा अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी करा. जागांऐवजी विजयासाठी काम करण्याचं कार्यकर्त्यांना सांगा, अशा सूचना राज्य भाजपला केल्या आहेत.
भाजपच्या नेत्यांची मुंबईत आज बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रातील दोन महत्त्वाचे नेते उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीला अवघे दोन अडीच महिने बाकी असताना जागांवरुन रस्सीखेच होऊ शकते. त्यामुळे आगामी काळात काय होतं याकडे सर्वांचं लक्ष आहे.