कीर्तीकर पिता-पुत्रात मतभेद, बाप शिंदे गटात, तर मुलगा ठाकरे गटात

शिवसेनेचे दिग्गज नेते गजानन कीर्तीकर आणि त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर यांच्यात खरी शिवसेना कुणाची? यावरुन मतभेद असल्याचं स्पष्ट झालंय.

कीर्तीकर पिता-पुत्रात मतभेद, बाप शिंदे गटात, तर मुलगा ठाकरे गटात
Follow us
| Updated on: Nov 11, 2022 | 10:22 PM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंडखोरी केल्याने शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. विशेष म्हणजे शिंदेंच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. काही कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाला तर काहींनी शिंदे गटाला पाठिंबा दिलाय. पण शिवसेनेच्या या दोन गटांची लढाई आता घरा-घरापर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे अभिनेते नाना पाटेकर यांनी हेच विधान एका कार्यक्रमात केलं होतं. त्यानंतर आज तसंच काहीसं दृश्य बघायला मिळतंय. कारण शिवसेनेचे दिग्गज नेते गजानन कीर्तीकर आणि त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर यांच्यात खरी शिवसेना कुणाची? यावरुन मतभेद असल्याचं स्पष्ट झालंय.

शिवसेनेचे जुने-जाणते नेते, खासदार गजानन कीर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केलाय. गजानन कीर्तीकर हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जुने सहकारी आहेत. त्यांचं शिंदे गटात जाण्याने ठाकरे गटाचं वैयक्तिक मोठं नुकसान झालंय. कारण त्यांचा राजकीय अनुभव हा ठाकरे गटासाठी महत्त्वाचा होता.

गजानन कीर्तीकर यांच्या शिंदे गटात जाण्याने ठाकरे गटातील खासदारांची संख्या कमी झालीय. विशेष म्हणजे गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात गेले असले तरी त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर यांनी ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

“वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी ऐकलं नाही. शिंदे गटात जाण्याचा वडिलांचा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे”, अशी प्रतिक्रिया अमोल कीर्तीकर यांनी दिलीय.

गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात जाणार असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर त्यांनी आज माहीम विधानसभा नागरीक सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी कीर्तीकर यांनी आपल्या मुलाचा शिंदे गटात प्रवेश करण्यास विरोध होता. त्यामुळे आपल्या प्रवेशाला उशिरा झाल्याचं त्यांनी नमूद केलं.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गजानन कीर्तीकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी कीर्तीकर यांनी शिंदेंच्या भूमिकेचं कौतुक केलं होतं. शिवसेना आणि भाजप हीच खरी युती, असं परखड मत गजानन कीर्तीकर यांनी मांडलं होतं.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.