शिवसेनेच्या शाखांवरून वाद चिघळला; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी साधला मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ठाकरे गटाने आता नरेश म्हस्के यांच्यावर टीका करताना त्यांनी शाखांची चावी घेऊन त्या लॉक करून जुन्या लोकाना त्यांनी बाहेर काढले आहे.
मुंबईः ठाण्यात शिवसेनेच्या शाखांवरून आता वाद चिघळला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून बळाचा वापर करून ठाकरे गटाच्या जुन्या कार्यकर्त्यांना बळाचा वापर करून त्यांना ठाण्यातील काही शाखांमधून बाहेर काढले जाते आहे. त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका करताना मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीकडून अशी कृत्य करणे शोभणारे नाही असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
तर दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी शिवसेना पक्ष चिन्ह आता आम्हालाच मिळाला आहे. त्यामुळे असणाऱ्या या शाखा आता आमच्याच आहेत असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यावर शिवसेनेकडून अन्याय केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ठाणे परिसरातील शाखा ताब्यात घेऊन ही शाखा आमचीच असल्याचे सांगत पोलिसांच्या मदतीने त्यानी जुन्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले असल्याचे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
नरेश म्हस्के यांच्यावर टीका करत ठाकरे गटाच्या कार्यर्त्यांनी सांगितले की आता शाखेवर भाड्याचे लोक आले असून त्यांनी आमच्याच शाखेतून आम्हाला बाहेर काढले आहे अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी नरेस म्हस्के यांनी शाखांची वाट लावली असल्याचा आरोप केला आहे. तर नरेश म्हस्के म्हणतात की,आता शिवसेना पक्ष आमचा आहे, चिन्ह आणि धनुष्य बाण आमचा त्यामुळे आता शाखामधून आमचेच लोक बसतील असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
ठाकरे गटाने आता नरेश म्हस्के यांच्यावर टीका करताना त्यांनी शाखांची चावी घेऊन त्या लॉक करून जुन्या लोकाना त्यांनी बाहेर काढले आहे. त्यामुळे आता ठाण्यात शिवसेना आणि ठाकरे गटाचा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.