Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळीत किती वाजेपर्यंत फटाके फोडता येणार? पालिकेकडून नियमावली जारी, नियम मोडल्यास…

मुंबई महापालिकेने दिवाळीनिमित्त फटाक्यांच्या वापराबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी ही नियमावली महत्त्वाची आहे.

दिवाळीत किती वाजेपर्यंत फटाके फोडता येणार? पालिकेकडून नियमावली जारी, नियम मोडल्यास...
दिवाळी
Follow us
| Updated on: Oct 29, 2024 | 5:00 PM

Diwali 2024 Celebrations : दिवाळी म्हटलं की आपल्यासमोर दिवे, पणती, आकाशकंदील, ठिकठिकाणी केलेली रोषणाई या सर्व गोष्टी डोळ्यासमोर येतात. त्यासोबतच दिवाळी म्हटल्यावर फटाक्यांची आतेषबाजी तर आलीच… मात्र गेल्या काही वर्षांपासून दिवाळीत फटाके फोडण्यावरुन बराच वाद सुरु आहे. दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात येतात. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाबरोबरच वायुप्रदूषणही होते. यामुळे फटाके फोडण्यावर बंदी घालावी, अशी मागणी वारंवार केली जाते. त्यातच फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी मुंबई महापालिकेकडून नियमावली जारी करण्यात आली आहे.

रात्री १० पर्यंतच फटाके वाजवण्यास परवानगी

मुंबई महापालिकेकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काही मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. यंदा मुंबईकरांनी दिवाळी अधिकाधिक पर्यावरणपूरक साजरी करावी. तसेच ध्वनीविरहित फटाक्यांचा वापर करण्यास प्राधान्य देत कमीतकमी वायू व ध्वनिप्रदूषण करणारे फटाके फोडावेत, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. तसेच मुंबईकरांनी रात्री १० पर्यंतच फटाके वाजवावे, त्यानंतर फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही मुंबई महापालिकेने म्हटले आहे.

दरवर्षी दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात येतात. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाबरोबरच वायुप्रदूषणही होते. प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेने यावेळी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. फटाक्यांच्या प्रदूषित हवेमुळे लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती, दम्यासारख्या आजाराचे रुग्ण अशा सर्वांनाच त्रास होतो. तसेच पर्यावरणाचेही नुकसान होते. यंदा प्रदूषण होऊ नये याकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

मुंबई महापालिकेची दिवाळीसाठी नियमावली

रात्री १० पर्यंत फटाके फोडण्यासाठी परवानगी ध्वनिविरहित फटाक्यांचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे कमीत कमी वायुप्रदूषण करणारे फटाके फोडावेत ज्येष्ठ नागरिक आणि हृदयरुग्णांप्रती जबाबदारी जाणून तीव्र आवाजाचे फटाके फोडणे टाळावे फटाके फोडताना शक्यतो सुती कपडे परिधान करावेत. सैल कपडे वापरू नयेत फटाके मोकळ्या जागी फोडावेत फटाके फोडताना सुरक्षेचा भाग म्हणून पाण्याने भरलेली बादली, वाळू इत्यादी बाबी जवळ बाळगाव्यात. फटाके फोडताना वाळलेली पाने, कागद किंवा कोणतीही इतर सामग्री जाळू नये. फटाके फोडताना फुलबाजी किंवा अगरबत्तीचा वापर करा

प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य.
सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट
सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट.
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का.
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला.
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'.
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती.