ज्यांना गरज आहे त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणे हे आमच्यासाठी खूप मोठ सौभाग्य आहे- डॉ. प्रकाश आमटे

डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ मंदाकिनी आमटे माँ शीला क्लिनिकच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईमध्ये पोहचल्या होत्या. यावेळी प्रकाश आमटे यांनी अत्यंत मोठे विधान केले. प्रकाश आमटे यांनी म्हटले की, खूप मोठ सौभाग्य आमचे आहे.

ज्यांना गरज आहे त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणे हे आमच्यासाठी खूप मोठ सौभाग्य आहे- डॉ. प्रकाश आमटे
Prakash Amte
Follow us
| Updated on: Apr 06, 2024 | 6:52 PM

डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ मंदाकिनी आमटे यांनी कुर्ला पश्चिम येथील माँ शीला क्लिनिकच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त सहभागी होऊन मार्गदर्शन केले. डॉ. प्रकाश आमटे म्हणाले की, गरजूंच्या चेहऱ्यावर हसू आणणे हे आपल्यासाठी मोठ सौभाग्य आहे. डॉ.प्रकाश आमटे म्हणाले की, देशातील गरिबी दुर्दैवी आहे. 10 रुपयांत दवाखाना चालवणे उल्लेखनीय आहे. आई आणि वडील ही समाजसेवेची प्रेरणा आहे. त्याच धर्तीवर मुंबई शहरात क्लिनिक सुरू केल्याचा मनोज नाथानी यांचा मला अभिमान आहे. प्राण्यांच्या बाबतीत भीती वाटतं नाही का असे लोक नेहमी विचारतात पण भीतीमुळे प्रेम करता येत नाही, असे सांगतानाच डॉ.आमटे म्हणाले की, आजही विविध प्रकारचे प्राणी प्रेमामुळे आपले होतात हे आम्ही अनुभवलं.

आज हेमलकसा येथे विविध प्रकल्पांतर्गत शिक्षण घेणाऱ्या आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणांची संख्या असल्यासही डॉक्टर आमटे यांनी सांगितलं. मानराज प्रतिष्ठानचे विश्वस्त व आयोजक मनोज राजन नाथानी यांनी समाजासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या माँ शीला क्लिनिकबद्दल सांगताना म्हणाले की,आजवर हजारो रुग्णांची केवळ दहा रुपयात रुग्णसेवा करताना एक वेगळंच समाधान लागतं.

डॉक्टर प्रकाश आमटे यांच्याकडूनच ही शिकवण घेतल्याचेही त्यांनी सांगितलं. दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या प्रसिद्ध सूत्रसंचालिका उन्नती जगदाळे यांनी डॉक्टर प्रकाश आमटे, डॉक्टर मंदाकिनी आमटे आणि मनोज नाथांनी यांच्या कार्याचे कौतुक केलं. डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांचे कुर्ला पश्चिम येथील माँ शीला क्लिनिकच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त टाळ, मृदुंग आणि ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

यानंतर कुर्ला पश्चिम येथील श्री कच्छी विसा ओसवाल सभागृहात बाबा आमटे यांच्या जीवनावर आधारित चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात 300 हून अधिक मुला-मुलींनी सहभाग घेतला. यावेळी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, उन्नती जगदाळे, डॉ.राजेंद्र सिंग, प्रमोद हिंदुराव, आर.यू.सिंग, उदय प्रताप सिंग, अमरजीत सिंग, शलाका कोरगावकर, अनुराग त्रिपाठी, आदित्य दुबे, विजयकुमार सिंग कौशिक, राजकुमार सिंग, जितेंद्र मिश्रा, हुमन राईट्स अँड अँटिकरप्शन मुंबई उपध्दक्षा सारिका जाधव, सुधीर सिंग, डॉ. खातू., अजय शुक्ला, चेतन कोरगावकर उपस्थित होते. संचालन दिनेश अडावदकर यांनी केले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.