पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाईंडशी तुमच्या मुलाची पार्टनरशिप आहे की नाही? पत्रकारांच्या प्रश्नावर सोमय्यांचं तत पप झालं

राकेश वाधवान हा पीएमसी घोटाळ्यातील एक आरोपी आहे. तो एक मोठा बिल्डर होता. बरंच काय काय सांगतात. आमचे सगळ्यांचे त्यांच्याशी संबंध आहेत अंस सोमय्या म्हणतात. पण मुळात राकेशच्या अकाऊंटमधून भाजपच्या खात्यावर 20 कोटी गेले आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता.

पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाईंडशी तुमच्या मुलाची पार्टनरशिप आहे की नाही? पत्रकारांच्या प्रश्नावर सोमय्यांचं तत पप झालं
Kirit Somaiya
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 10:58 AM

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी शिवसेना भवनातून भाजपविरोधात एल्गार पुकारला. राऊत यांनी आज शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) पत्रकार परिषद घेत राज्यातला विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या राज्यातील नेत्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. संजय राऊत यांनी सर्वात आधी शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांचा समाचार घेतला. राऊत यांनी सोमय्या यांच्यावर पीएमसी घोटाळ्याप्रकरणी (PMC Bank Scam) गंभीर आरोप केले. इतकंच नाही तर सोमय्या यांचे राकेश वाधवानशी (Rakesh Wadhwan) थेट संबंध असल्याचा आरोप सोमय्या राऊत यांनी केला.

राकेश वाधवान हा पीएमसी घोटाळ्यातील एक आरोपी आहे. तो एक मोठा बिल्डर होता. बरंच काय काय सांगतात. आमचे सगळ्यांचे त्यांच्याशी संबंध आहेत अंस सोमय्या म्हणतात. पण मुळात राकेशच्या अकाऊंटमधून भाजपच्या खात्यावर 20 कोटी गेले आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

नील सोमय्या आणि किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप

ईडी वाले सुनो.. सीबीआयवाले सुनो.. सगळ्यांनी ऐका जरा माझं. हा जो किरीट सोमय्या आहे तो एक फ्रॉड आहे. त्यांनं बँक घोटाळा केला आहे. लोकांचे पैसे बुडवलेत. तर मी विचारचो की निकॉन इन्फ्रा कंन्स्ट्रक्शन कंपनी कुणाची? तर किरीटची, नील सोमय्याची आणि हा राकेश वाधवानचा पार्टनर आहे. मौजे गोखिवरे वसईत यानं तिथं एक प्रोजेक्ट केलाय. वाधवानला यांनीच ब्लॅकमेल केलं आणि त्याला लुबाडलं आणि आपल्या फ्रंटमॅनच्या नावे व्यवहार केले. कॅशही घेतली. तब्बल 100 कोटी घेतले. लडानीच्या नावावर त्यांनी जमीन घेतली. 400 कोटी रुपयांची जमीन फक्त 4.4 कोटी रुपयांनी खरेदी केली. त्यांनी अशा वेगवेगळ्या जमिनी घेतल्या.. या कंपनीचा डायरेक्ट आहे नील किरीट सौमय्या आहे, असा थेट आरोप राऊत यांनी केला आहे.

पत्रकारांच्या प्रश्नावर सोमय्यांचं तत पप झालं

दरम्यान, राऊत यांनी काल आरोप केल्यानंतर किरीट सोमय्या यांना आज पत्रकारांनी सोमय्या यांना विचारले की, पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाईंडशी तुमच्या मुलाची पार्टनरशिप आहे की नाही? पत्रकारांच्या या प्रश्नावर सोमय्यांचं आज पुन्हा तत पप झालं. त्यानंतर पुन्हा एकदा पत्रकारांनी तोच प्रश्न विचारला. यावेळी सोमय्या यांनी ही गोष्ट सावरुन नेत पीएमसी बाँकेतील घोटाळ्याशी आमचा दमडीचा संबंध नाही असं सांगितलं. सोमय्या म्हणाले की, आम्ही त्या बँकेतून एक पैसासुद्धा घेतलेला नाही. ज्या फ्रंटमॅनबद्दल राऊत बोलतायत तो कोणाचा माणूस आहे ते येत्या काही दिवसात समोर येईल. राकेश वाधवान किंवा पीएमसी घोटाळा याच्याशी आमचा काहीच संबंध नाही. हे मी पुन्हा एकदा सांगतो. उलट पीएमसी घोटाळा मीच बाहेर काढला, असा दावा सोमय्या यांनी केला आहे. डीएचएफल घोटाळा पण आम्हीच बाहेर काढला. तरीही तर संजय राऊत यांच्याकडे याच्याशी सबंधित डॉक्यूमेंट होते किंवा आहेत तर त्यांना ईडीने इतक्या वेळा बोलवलंय तेव्हा द्यायला हवे होते, ते आताही देऊ शकतात.

व्हिडीओ पाहा

सोमय्यांचा निकॉन प्रकल्पाची चौकशी करा : राऊत

निकॉन फेज वन आणि टू असे प्रकल्प उभारले जात आहेत. पर्यावरणाच्या परवानग्या नाही, हरित लवादानं एक्शन घेतली, तर त्यावर कारवाई होईल. आदित्य ठाकरेंना माझं आवाहन आहे की याची ताबडतोब चौकशी करा, नील सोमय्याला अटक करा. राऊत पुढे म्हणाले की, मुळात पीएमसी घोटाळ्यातील आरोपीनं सोमय्याच्या जवळच्या माणसाला का जमीन विकली? हा भ्रष्टाचाराशी लढणारा माणूस आम्हाला ज्ञान देतोय, आम्हाला अक्कल शिकवतोय. एकीकडे भ्रष्टाचारविरोधाची भजनं करायची आणि दुसरीकडे भ्रष्टाचार करायचा, असा टोलाही राऊतांनी सोमय्या यांना लगावलाय. तसंच देवेंद्र लधानी हा सोमय्याचा फ्रंटमॅन आहे. त्याच्या नावे व्यवहार केले जात आहेत. याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी राऊत यांनी केलीय.

इतर बातम्या

महाराष्ट्राचं डोकं गरगरलं! सोमय्या म्हणतात, ज्या 19 बंगल्यांचा टॅक्स रश्मी ठाकरे भरतायत तेच चोरीला ! कसे?

जोड्यानं मारू मला म्हणताय की रश्मी ठाकरेंना? 19 बंगल्यावरून राऊतांना किरीट सोमय्यांचा सवाल, पुरावेच दिले!

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.