Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोंबिवली स्फोटात चार किलोमीटरचा परिसर हादरला, आठ जणांचा मृत्यू, शोधकार्य अजून अपूर्ण

fire in dombivli: डोंबिवलीत एका केमिकल कंपनीत स्फोट झाला. या स्फोटानंतर धुरांचे मोठे लोट परिसरात पसरले. घटनास्थळी चार अग्नीशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

डोंबिवली स्फोटात चार किलोमीटरचा परिसर हादरला, आठ जणांचा मृत्यू, शोधकार्य अजून अपूर्ण
Follow us
| Updated on: May 24, 2024 | 7:23 AM

डोंबिवली ‘एमआयडीसी’तील ‘अमुदान’ या रसायन कंपनीत गुरुवारी दुपारी बॉयलरचा भीषण स्फोट झाला. त्या दुर्घटनेत आठ कामगार ठार झाले तर ६५ जखमी झाले. जखमींमध्ये शेजारच्या काही कंपन्यांतील कामगारांचाही समावेश आहे. स्फोटानंतर लागलेल्या आगीत कंपनी भस्मसात झाली. या स्फोटाने तीन ते चार किलोमीटरचा परिसर हादरला होता. तब्बल नऊ ते दहा तासाने आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाला यश आले. मात्र रात्री अंधार झाल्याने या अपघातात कामगारांचा शोध अग्निशामक दलाली बंद केला होता. जेसीबीच्या साह्याने मलबा हटवत लोकांचा शोध अग्निशमन दलाचे कर्मचारी करणार आहेत. या प्रकरणात कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परिसरातील अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

आगीची भीषणता पाहून उल्हासनगर, अंबरनाथ, ठाणे येथून अग्नीशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या आहेत. डोंबिवली तापमान ४२ अंश सेल्सियस आहे. वाढत्या तापमानामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे अवघड झाले आहे. स्फोट झाल्यानंतर अनेक वस्तू हवेत उडाल्या. आगीची माहिती मिळाल्यावर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे.

शेजारच्या इमारतीच्या काचा फुटल्या

केमिकल कंपनीला लागलेली आग इतर ठिकाणी पसरत आहे. या स्फोटामुळे कंपनी शेजारी असलेल्या इमारतीच्या कामचा फुटल्या आहेत. आगीची घटना दोन किलोमीटर लांबून दिसत आहे. अनेक जण मोबाईलवर त्याचे शुटिंग करत आहेत. आग विझवणे हे अग्नीशमन दलापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा

आगीची भीषणता पाहून परिसरात राहणाऱ्या लोकांना घरातून बाहेर काढण्यात आली आहे. तसेच डॉक्टरांचे पथक तैनात ठेवले असल्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. कंपनीत फायर ऑडिट झाले नसल्यास मोठी कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फायर ऑडिट होत नाहीच- आव्हाड

दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीत मोठी आग लागली होती. त्या आगीची झळ घराघरातपर्यंत पोहचली होती. दोन किलोमीटरपर्यंत ती आग पसरली होती. त्यानंतर एमआयडीसी कडून फायर ऑडिट केले गेले नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. नेहमी आग लागते, चौकशी होते, दोन दिवस बातम्या सुरु असतात, त्यानंतर विषय संपतो, परंतु ठोस उपाययोजना होत नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.